Take a fresh look at your lifestyle.

होणार लाखाची सभा; म्हणून सीएम रेड्डी यांची बहिण शर्मिला करणार नव्या पार्टीची स्थापना..!

हैदराबाद :

Advertisement

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची बहीण वाईएस शर्मिला या एक नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत. त्यासाठी त्यांनी एक लाख लोकांचा सहभाग असलेल्या सभेचे नियोजन केलेले आहे. शेजारील तेलंगणामध्ये हा नवीन प्रादेशिक पक्ष स्थापना होणार आहे. कोरोना काळातील या अशा मोठ्या राजकीय सभेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

Advertisement

शर्मिला यांनी सांगितले आहे की, तेलंगाना राज्याचे टीआरएस सरकार राजकीय कारणांमुळे या सभेत अडथळे आणण्याचे प्रयत्न करीत आहे. शुक्रवारी वाईएस शर्मिला खम्मम जिल्ह्यातील मैदानावर रॅलीला संबोधित करतील. संकल्प सभेच्या नावाखाली आयोजित या कार्यक्रमात किमान एक लाख लोकांची गर्दी अपेक्षित आहे. याशिवाय वाय.एस. शर्मिला या हैदराबादमधून सुमारे 1000 गाड्यांच्या काफिलासह खम्ममला पोहोचणार अशीही बातमी आहे.

Advertisement

यापूर्वीच सक्रिय राजकारणामध्ये प्रवेश करण्याविषयी शर्मिला यांनी नवीन पार्टीच्या प्रारंभासाठी खम्ममची निवड केली आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांचे वडील व दिवंगत माजी मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी यांच्या सहानुभूतीचा आधार. अशा परिस्थितीत वडिलांच्या राजकीय भूमीचा फायदा घेण्यासाठी त्यांनी येथून पक्ष स्थापन करण्याची घोषणा करण्याचा निर्णय घेतला आहे. 2014 मध्ये शर्मिला यांचा भाऊ व आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षानेही खम्मममधून एक लोकसभा आणि दोन विधानसभा जागा जिंकल्या होत्या. वाईएस शर्मिला शुक्रवारच्या कार्यक्रमात पक्षाचे नाव, ध्वज आणि विचारधारा जाहीर करतील.

Advertisement

आंध्रप्रदेशऐवजी तेलंगणामध्ये नवीन पक्षाच्या घोषणेसंदर्भात शर्मिला यांनी म्हटले आहे की, वडिलांचे स्वप्न पूर्ण करताना त्यांना ‘राजन्ना राज्यम’ म्हणजे ‘राजशेखर रेड्डी का शासन’ आणायचे आहे. या विशाल जनसभेचे आयोजन करण्याची जबाबदारी असलेल्या कोंडा राघव रेड्डी यांनी सांगितले की, यासाठी पोलिसांकडून आवश्यक ती परवानगी घेण्यात आली आहे. कोरोना प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केले जाईल. तरीही तेलंगणा राष्ट्र समितीचे स्थानिक नेते त्यात अडथळे आणू शकतात. ते कोरोनाचे ढोंग करून आमची सभा रद्द करण्याचा प्रयत्न करतील.

Advertisement

दरम्यान, खम्ममचे एसीपी बी.बी. अंजनेयुलू म्हणाले की, कोविड प्रोटोकॉलचे पालन केले जाईल आणि नियमांचे उल्लंघन होणार नाही या अटीवर शर्मिलाच्या सभेला परवानगी देण्यात आली आहे. आम्ही प्रत्येकाला कोरोना प्रोटोकॉलचे अनुसरण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचे उल्लंघन केल्यास दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply