Take a fresh look at your lifestyle.

चंद्रकांतदादा कडाडले; उद्धव ठाकरेंना दिले आव्हान, पहा काय म्हटलेय अजितदादांबाबत

पुणे :

Advertisement

‘एका अर्थाने राज्यात मोगलाई आली आहे. सगळीकडे हम करे सो कायदा, असे चित्र आहे. आम्ही कसलेही कायदे पाळणार नाही असेच सत्ताधाऱ्यांना वाटत आहे. एकीकडे शरद पवारांनी फेसबुकच्या माध्यमातून सगळ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केलेले आहे. त्यांना आम्ही सहकार्य करत आहोतच. आमचा प्रचंड विरोध होता पण एका शब्दाने बोललो नाही. मात्र, आता अजित पवारांवर कारवाई करा की मग. आहे का उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत’, असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

Advertisement

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचाराच्या निमित्ताने अजित पवार पंढरपुरात असताना करोना नियमांची पायमल्ली होत असल्याचा मुद्दा पाटील यांनी उपस्थित केला आहे. भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनीही यावर भूमिका घेतली आहे. त्यांनी म्हटले आहे की, एकीकडे शरद पवार करोनाचे नियम पाळा म्हणून महाराष्ट्राला आवाहन करतात, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत पंढरपुरात नियमांची धज्जी उडवली गेली आहे, नियम काय फक्त सर्वसामान्यांना आहेत का पवार साहेब?

Advertisement

Pravin Darekar – प्रविण दरेकर on Twitter: “एकीकडे @PawarSpeaks साहेब कोरोनाचे नियम पाळा म्हणून महाराष्ट्राला आवाहन करतात, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते @AjitPawarSpeaks यांच्या उपस्थितीत पंढरपुरात नियमांची धज्जी उडवली गेली आहे, नियम काय फक्त सर्वसामान्यांना आहेत का पवार साहेब ? @BJP4Maharashtra https://t.co/9Fo3ABkcZM” / Twitter

Advertisement

‘पवार साहेब, गुन्हा दाखल करायला सांगणार का उपमुख्यमंत्र्यांविरुद्ध? करणार नसाल तर आजपासून महाराष्ट्रातील कुणावरही नियम मोडल्याबद्दल सरकारला गुन्हा दाखल करता येणार नाही,’ असेही दरेकर यांनी म्हटलेले आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘सरकारने जी नियमावली तयार केली होती त्यातून पंढरपूर निवडणूक वगळण्यात आली होती. भाजपाला त्यांचा उमेदवारासाठी परवानगी हवी असेल तर त्यांनाही दिली जाईल. राष्ट्रवादीसाठी वेगळा नियम नाही,’ असेही मलिक यांनी म्हटलेले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply