Take a fresh look at your lifestyle.

शरद पवारांनी जनतेला केले आवाहन; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी

मुंबई :

Advertisement

मिनी लॉकडाऊन लागू केल्यानंतर राज्यभरात विरोधाचा सूर उमटला आहे. केंद्र सरकारच्या लॉकडाऊनला संपूर्ण सहकार्य करणाऱ्या व्यापारी मंडळींचा आता आर्थिकदृष्ट्या तोल ढळलेला असल्याने हा विरोध आहे. त्यातच रुग्णसंख्या वाढत असताना विरोधी पक्ष असलेल्या भाजपने राजकीय डाव खेळल्याची टीका होत आहे. केंद्राकडून लस आणि इतर मदत कमी मिळत आहे. त्यानिमित्ताने ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जनतेला आवाहन केले आहे.

Advertisement

त्यांनी म्हटले आहे की, कोरोना रुग्णांची वाढती लोकसंख्या ही चिंताजनक बाब आहे. डॉक्टर, परिचारक, आरोग्य कर्मचारी अहोरात्र कष्ट घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारला काही कठोर निर्बंध लागू करावे लागत आहेत. केंद्र सरकारही या संबंधी आग्रही आहे. सगळ्या राजकीय नेत्यांना, प्रसारमाध्यमांना, सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या घटकांना माझी आग्रहाची विनंती आहे की परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नात आपले सहकार्य असू द्या.

Advertisement

Sharad Pawar on Twitter: “कोरोना रुग्णांची वाढती लोकसंख्या ही चिंताजनक बाब आहे. डॉक्टर, परिचारक, आरोग्य कर्मचारी अहोरात्र कष्ट घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारला काही कठोर निर्बंध लागू करावे लागत आहेत. केंद्र सरकारही या संबंधी आग्रही आहे. https://t.co/bInuoDvYAd” / Twitter

Advertisement

महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस, सर्व घटक अशा संकटाच्या काळात बाकीच्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून हिमतीने सामोरं जाण्यासाठी यंत्रणेला सहकार्य देतील याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. या सामुदायिक प्रयत्नांतून आपण कोरोनावर निश्चित मात करू आणि या संकटातून नागरिकांची सुटका करू, असेही त्यांनी म्हटलेले आहे.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply