Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक : म्हणून वाझेच्या पत्रात अजितदादांचाही उल्लेख; पहा नेमका काय केलेला आहे दावा

मुंबई :

Advertisement

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या जिलेटीनकांड्याच्या कारचा मुद्दा मागे पडून आता या प्रकरणात लेटरबॉंब फुटत आहेत. मुंबईचे माजी आयुक्त परमवीर सिंग यांच्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेच्या कोठडीत असलेल्या निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यानेही पत्र लिहिले आहे. त्यात त्याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह मंत्री अनिल परब यांनी पैसे मागितल्याचा दावा केला आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही उल्लेख आहे.

Advertisement

एका व्यक्तीने वाझे याच्याकडे संपर्क साधला होता. तो अजितदादांचा अगदी जवळचा माणूस असल्याचे आपल्या पत्रात म्हटलेले असतानाच 100 गुटखा व्यापाऱ्यांकडून 100 कोटी रुपये आणण्याच्या सूचना त्या व्यक्तीने दिल्या. एकूणच वाझे प्रकरणातून राजकीय मुद्देच बाहेर पडण्यास सुरुवात झाल्याने मूळ गुन्ह्याचे नेमके काय, असाच संभ्रम निर्माण झालेला आहे.

Advertisement

दरम्यान,  परब यांनी पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडताना म्हटले आहे की, दैवत असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची व माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो की, सचिन वाझे यांच्या पत्रातील आरोप खोटे आहेत. त्यावर याचे राजकारण तापवत असलेल्या भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आरारा… काय वेळ आली आहे अनिल परब यांच्यावर…त्यांना कोणी तरी सांगा, ह्याच्या त्याच्या शपथा घेऊन न्यायालयातून सुटका होत नसते. तुम्हीही दिल्लीत जाऊन एखादा वकील गाठा”.

Advertisement

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘अनिल परब यांच्या राजीनाम्यासाठीही कोर्टाच्या आदेशाला प्रतीक्षा करावी लागेल असे दिसते?’ उल्लेखनीय आहे की 24 तासांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारच्या आणखी एका मंत्र्यांची विकेट येत्या 8 दिवसांत पडण्याची घोषणा केली होती.

Advertisement

हाच धागा पकडून मंत्री परब यांनी म्हटले आहे की, दुसरी विकेट घेणार आहोत, असा आरोप भाजप नेते गेल्या दोन दिवसांपासून करत आहेत. याचा अर्थ असा आहे की हे खोटे आरोप माझ्यावर आणि सरकारला बदनाम करण्यासाठी केले जात आहेत. हे खोटे बोलण्यात भाजपाचा हात आहे. भाजपा नेत्यांना आधीच माहित होते की सचिन आज मला एक पत्र लिहिणार आहे आणि या पत्रात तो हा खोटा आरोप करणार आहे.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply