Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग : माजी एनकाउंटर स्पेशलिस्ट शर्माही NIA ऑफिसमध्ये; पहा नेमके काय चालू आहे वाझे प्रकरणात

मुंबई :

Advertisement

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओने भरलेल्या स्फोटकांच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. याप्रकरणी गृहखात्यात महत्वपूर्ण बदल झाला आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) आज मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची चौकशी केल्यानंतर शिवसेना नेते आणि माजी एनकाउंटर स्पेशलिस्ट पोलीस अधिकारी प्रदीम शर्मा यांनीही कार्यालयात बोलावले आहे.

Advertisement

परंबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. ते म्हणाले होते की, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला गृहमंत्र्यांनी 100 कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. या प्रकरणात एनआयएने यापूर्वीच मुंबई पोलिसांच्या या निलंबित अधिकाऱ्यांला अटक केली आहे. त्याची चौकशी केली जात आहे. दरम्यान, या केसमधील गुंता वाढत आहे.

Advertisement

अँटिलीया प्रकरणात माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग आणि सचिन वाझे यावरील आरोपांची चौकशी केली जात आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांचे विद्यमान आयुक्त हेमंत नगराळे यांनी सचिन वाजे आणि त्याच्या पोस्टिंगबद्दल उपलब्ध असलेल्या गोष्टींवरून परमबीर सिंह आणखीन चक्रात अडकल्याचे दिसत आहेत. आयुक्त हेमंत यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे की, परमवीर सिंग यांच्या सूचनेवरून सचिन वाझे याला पुन्हा कामावर घेतले गेले होते आणि वाजे थेट त्यांनाच रिपोर्ट करायचे.

Advertisement

ANI on Twitter: “Mumbai: Shiv Sena leader and former encounter specialist Pradeep Sharma arrives at the NIA office https://t.co/aoqAfVqj2S” / Twitter

Advertisement

मुंबई पोलिस आयुक्त नागराळे यांनी वाझे याच्या पुन्हा कामावर रुजू होण्यासह त्याच्या गुन्हे शाखेच्या मुंबई सीआययूमध्ये नऊ महिन्यांच्या कार्यकाळासंदर्भात महाराष्ट्र गृह विभागाला अहवाल सादर केला आहे. मुंबई पोलिसांनी सादर केलेल्या या अहवालात म्हटले आहे की, वाझेला तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या मौखिक सूचनेनंतर गुप्तचरमध्ये नेमणूक दिली होती. वाझे हा इतर अनेक अधिकाऱ्यांना बाजूला ठेवून थेट परमबीर सिंग यांना अहवाल देत होता.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply