Take a fresh look at your lifestyle.

गौप्यस्फोट : आणखी एका मंत्र्यावरही आरोप; पहा वाझेने नेमके काय पत्र लिहिलेय NIA ला..!

मुंबई :

Advertisement

सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझे यानेही ‘लेटरबॉम्ब’ टाकला आहे. एनआयएच्या कोठडीत असलेल्या वाझे याने तापसी अधिकाऱ्यांना एक पत्र लिहिले आहे. त्यात त्याने धक्कादायक असा दावा केला आहे.

Advertisement

२०२० मध्ये पोलिस दलात पुन्हा सामावून घेण्याला विरोध असल्याने नियुक्ती रद्द करण्यासाठीची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची इच्छा होती. त्यावेळी आपण पवारांचे मतपरिवर्तन करण्याचे सांगून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मला मला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, असाही दावा वाझे याने केला आहे.

Advertisement

या पत्रात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप केला आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, वाझेने एनआएला दिलेल्या हस्तलिखित पत्रात दावा केला आहे की, 2 कोटी रुपये दिले तर ते शरद पवारांना पटवून देतील. महाराष्ट्र परिवहन मंत्री अनिल परब यांनीही बीएमसीशी संबंधित 50 कंत्राटदारांकडून 2-2 कोटी रुपये घेण्यास सांगितले होते.

Advertisement

माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांनी वाझेला दरमहा 100 कोटी रुपये वसुली करण्याचे लक्ष्य दिले होते आणि त्याच्या पद्धतीही सांगितल्या असल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. हायकोर्टाने सीबीआयमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र, उद्धव सरकार अजूनही देशमुखांचा बचाव करीत असून या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात संपर्क साधला आहे. अशावेळी हे नवीन पत्र आल्याने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधातील वातावरण आणखी तापले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply