Take a fresh look at your lifestyle.

CIA संचालकांनी केलाय अजब दावा; त्यावेळी एलियन्सनी हवेतच रोखले होते विमान..!

वॉशिंग्टन :

Advertisement

अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएचे माजी संचालक जेम्स वूलसे यांनी जगामध्ये एलियन असल्याचा महत्वपूर्ण दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे जगभरातील संशोधक उलटसुलट चर्चेत गुंतले आहेत. एकूणच यानिमित्ताने पुन्हा एकदा या विश्वात मानव एकटाच नसल्याच्या बातम्यांना ऊत आलेला आहे.

Advertisement

जेम्स म्हणाले की, यापूर्वी त्यांना एलियन व्यक्तींच्या अस्तित्वाबद्दल शंका होती. अनेकदा त्यांनी ही शंका मित्र व कार्यालयात जगजाहीर बोलून दाखवली होती. परंतु जेव्हा एका मित्राचे विमान हवेतच 40,000 फूट उंचीवर थांबले. तेव्हा त्यांनी आपले मत बदलले आहे. त्यांनी अशी आशा केली की जर एलियन उपस्थित असतील तर आपण त्याच्याशी मैत्री करू शकू.

Advertisement

सीआयएचे माजी संचालक प्रथमच एलियनच्या शक्यतेवर उघडपणे बोलले आणि मित्राचे विमान 40,000 फूट उंचीवर अचानक थांबाण्याची कहाणीही त्यांनी सांगितली आहे. त्यांना अशा आहे की, जर एलियनने कधीही संपर्क साधला तर मानव त्या लोकांशी ‘मैत्री’ करण्यास सक्षम असेल. जेम्स 1993 ते 1995 या काळात सीआयएचे संचालक होते.

Advertisement

यूट्यूबवर दिलेल्या मुलाखतीत जेम्सने त्यांचे ऑपरेशन ड्रॅगन हे नवीन पुस्तक समजावून सांगितले. या संभाषणादरम्यान ते म्हणाले की, गेल्या कित्येक वर्षांत हवेतल्या अनेक रहस्यमय गोष्टींबद्दल ऐकले आहे. यात विमानांसारख्या गोष्टींबद्दल बोलले गेले आहे. असे अहवाल नेहमीच खरे नसतात. परंतु, अशी एक घटना घडली जेव्हा माझ्या एका मित्राचे विमान अचानक 40 हजार फूट उंचीवर थांबले आणि सामान्य विमानासारखे उड्डाण करता आले नाही.

Advertisement

‘ही का होत आहे, मला माहिती नाही. कुणाला माहित आहे का? ‘, असेही त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी सीआयएच्या अनेक माजी संचालकांनीही एलियन असण्याची शक्यता दर्शविली होती. एवढेच नव्हे तर इस्राईलच्या पूर्वीच्या अंतराळ सुरक्षा कार्यक्रमाचे प्रमुख हॅम ईशेद यांनी दावा केला होता की, विश्वामध्ये एलियन आहेत आणि त्यांचा अमेरिका आणि इस्रायलशीही संबंध आहे. एवढेच नव्हे तर अमेरिकेचे जाणारे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हे चांगले ठाऊक आहे.

Advertisement

एलियन लोकांची उपस्थिती लपवून ठेवली गेली आहे. कारण मानवता अद्याप त्यासाठी तयार नाही. इस्रायलचा अंतराळ सुरक्षा कार्यक्रम जवळजवळ 30 वर्षे हाताळणारे हॅम ईशेद म्हणाले की, ‘गॅलेक्टिक फेडरेशन’ तयार केली गेली आहे जी अमेरिकेबरोबर गुप्त कराराखाली मंगळावर भूमिगत तळ चालवित आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply