जीएसटीबाबत सुप्रीम कोर्टाने फटकारले; पहा नेमके कोणत्या मुद्द्यांवर सुनावले सरकारी यंत्रणेला
दिल्ली :
देशातील वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी म्हणजे एक वेगळीच डोकेदुखी बनली आहे. व्यापाऱ्यांनी आणि सामान्य ग्राहकांनी या कराची धास्ती घेतली आहे. त्याच मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयाने मोठी टिप्पणी केली आहे. जीएसटीची अंमलबजावणी ज्या पद्धतीने केली जाते त्यावर नाराजी व्यक्त करताना कोर्टाने म्हटले आहे की, जीएसटी हा सिटीझन फ्रेंडली कर असावा असा संसदेचा हेतू होता. परंतु, ज्या प्रकारे देशभरात त्याची अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे हा उद्देशच संपला आहे.
सुप्रीम कोर्टाने असेही म्हटले आहे की, कर देणारा प्रत्येक व्यावसायिकाला फसवणूक करणारा म्हणू शकत नाही. हिमाचल प्रदेश राज्यातील जीएसटीच्या तरतूदीला आव्हान देणार्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड म्हणाले की, जीएसटी नागरिकांसाठी करप्रणाली असावी असा संसदेचा हेतू होता. परंतु, ज्या पद्धतीने ती देशभर राबविली जात आहे त्याने तिचा हेतू संपला आहे.
हिमाचल प्रदेश जीएसटी कायदा २०१७ च्या तरतुदीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणात कार्यवाही प्रलंबित असताना अधिकारी बँक खात्यासह इतर मालमत्ता जप्त करू करत आहेत. जीएसटी कायद्याच्या कलम ८३ मध्ये अशी तरतूद केली आहे की, जर एखादी बाब प्रलंबित असेल आणि आयुक्तांनी शासनाच्या महसुलाच्या हिताचे रक्षण करणे आवश्यक आहे असे मानले तर संबंधित पक्षाचे मालमत्ता आणि बँक खाते (ज्याचा कर आहे) इत्यादी जोडता येतात.
जीएसटी अंमलबजावणीवर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करताना म्हटले आहे की, करदाता प्रत्येक व्यावसायिकाला फसवणूक करणारा म्हणू शकत नाही. जीएसटीची रचना संसदेने तयार केली ती नागरिकांना अनुकूल बनविली गेली पण ती राबविण्याच्या पद्धती आपल्या उद्देशापासून विचलित झाली आहे. हिमाचल प्रदेश जीएसटी कायद्याच्या कलम ८३ ला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.
संपादन : विनोद सूर्यवंशी
कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..
- कोविड ज्ञान : ऑक्सिजनचा वापर आणि करोना कोणत्या ठिकाणी पसरतो, याची माहिती नक्की वाचा
- म्हणून रात्री झोपण्याअगोदर प्यायचा असतो गुळ; पहा कोणते फायदे होतात या सध्या गोष्टीमुळे
- या 5 गोष्टी खा आणि उन्हाळ्यात वजन कमी करा; ‘चरबीवान’ मंडळींसाठी आहे ही खास माहिती
- IPL 2021 : दिल्ली कॅपिटल Vs पंजाब किंग्जचे संघ भिडणार; पहा काय असेल प्लेइंग इलेव्हनची लिस्ट
- IPL 2021 : मॉर्गनसमोर असेल कोहलीचे आव्हान; पहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन कोण ते