Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक : म्हणून न्यूज अँकर गोत्यात; कमावले 3 कोटी, पहा शेअर बाजारातील भन्नाट किस्सा

शेअर बाजारात अफवांचा बाजार गरम करून पैसे कमावणारे महान बिजनेस टायकून अनेकदा उघडे पडतात. बाजारातील टायकून मंडळींचा हा प्रकार आता आश्चर्यकारक उरलेला नाही. मात्र, एका बिजनेस न्यूज चॅनेलच्या न्यूज अँकरला अशाच प्रकरणात अफवा पसरवून पैसे कमावण्याच्या धंद्यात कारवाईला सामोरे जावे लागल्याचे आपणास माहित आहे की? नसेल तर हा भन्नाट किस्सा नक्कीच वाचा.

Advertisement

13 जानेवारी रोजी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) या भारतातील बाजार नियामक एजन्सीने सीएनबीसी आवाज वाहिनीचे अँकर हेमंत घई आणि त्यांच्या कुटुंबातील दोन इतर सदस्यांना आगाऊ सूचनेच्या आधारे व्यवहार प्रकरणात फसवणूक केल्याबद्दल दोषी ठरवले होते. सेबीच्या आदेशानुसार हेमंतला शेअर घेण्यावर गुंतवणूकीची शिफारस किंवा विक्री व खरेदी करण्याची शिफारस करण्यास मनाई घातली आहे. हेमंत ‘स्टॉक 20-20’ या कार्यक्रमात अँकर होते. बाजार उघडण्यापूर्वी सकाळी 7.20 वाजता हा शो प्रसारित होतो.

Advertisement

चौकशीत सेबीने हेमंत, त्यांची पत्नी जया घई आणि त्याची आई श्याम मोहिनी घई यांना बीटीएसटी व्यापार नावाच्या (आज खरेदी, उद्या विक्री) या व्यवसायात असल्याचे म्हतेल आहे. ज्यामध्ये घईंनी एक दिवसांपूर्वी शेअर्स खरेदी केले आणि दुसर्‍या दिवशी आपल्या कार्यक्रमात खरेदी करण्याची शिफारस केली आणि जेव्हा शेअर्सची किंमत वाढली, तेव्हा ते नफ्यात विकले. हे व्यवसाय एमएएस कन्सल्टन्सी या वित्तीय सेवा कंपनीद्वारे पार पाडले गेले. सेबीला तपासात आढळले की घई यांना या व्यवहारांमधून 2.95 कोटींचा नफा झाला होता.

Advertisement

सेबीच्या चौकशीत आढळले आहे की, जया आणि श्याम मोहिनी यांच्या व्यवसायातील पद्धतींकडे 1 जानेवारी 2019 ते 31 मे 2020 पर्यंतच्या व्यवहारातून असे केल्याचे स्पष्ट झालेले आहे. हेमंतने आपल्या प्रोग्राममध्ये समान शेअर्स खरेदी व विक्रीची शिफारस केल्यावर दुसर्‍याच दिवशी विक्री केली गेली होती.

Advertisement

उदाहरणार्थ, 8 जानेवारी 2020 रोजी जया घई यांनी एप्टेक लिमिटेड या शैक्षणिक कंपनीचे 159.15 रुपये किमतीला 82.76 लाख रुपयांचे 52000 शेअर्स खरेदी केले. दुसर्‍या दिवशी हेमंतने शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली. त्यानंतर हे शेअर्स सकाळी 183.19 रुपयांना विकले गेले. या डीलमधून त्याला 12.5 लाख रुपयांचा नफा मिळाला.

Advertisement

*(ता. क. : या प्रकरणावर hindi.caravanmagazine.in यांनी स्पेशल स्टोरी केलेली आहे. त्यात याचा सविस्तरपणे वृत्तांत आहे. तो वाचण्यासाठी दर्शकों को गुमराह करने पर सीएनबीसी आवाज के एंकर हेमंत घई पर सेबी ने लगाया प्रतिबंध (caravanmagazine.in) या लिंकवर क्लिक करा)

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply