Take a fresh look at your lifestyle.

चीनने ‘त्या’ मुद्द्यावर दिलीय भारताला पुन्हा धमकी; पहा काय म्हटलेय ‘ग्लोबल टाईम्स’ने

दिल्ली :

Advertisement

भारताचा कुरापतखोर शेजारी चीन नको त्या मुद्द्यावर पुन्हा-पुन्हा आग ओकताना दिसत आहे. भारताने वेळोवेळी त्यांना धडा शिकवलेला असतानाही आता पुन्हा एकदा चीनी सरकारचे मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’ने तैवान मुद्द्यावर गरळ ओकली आहे.

Advertisement

तैवानच्या विषयावर भारतात चर्चा न करण्याच्या सूचनाच त्या वृत्तपत्रातून देण्यात आलेल्या आहेत. ग्लोबल टाईम्सच्या एका लेखात असा थेट इशारा देण्यात आला आहे की, तैवानला पाठिंबा दर्शविल्यास ड्रॅगनला भारताचे नुकसान करण्याचे अनेक मार्ग खुले आहेत. या वृत्तपत्राने शांघाय इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल स्टडीजच्या सेक्रेटरी जनरल लियू जोंगी यांचा हवाला देऊन दावा केला आहे की, अशावेळी चीन पूर्वोत्तरमधील फुटीरवादी सैन्यांना पाठिंबा देऊ शकतो.

Advertisement

ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे की, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय करारांच्या आधारावर एकमेकांच्या प्रादेशिक अखंडतेचा आणि एकत्रितपणाचा आदर करणे समाविष्ट आहे. तैवानचा स्वतंत्र देश म्हणून उल्लेख करणे किंवा त्यांना तशी वागणूक देणे हे द्विपक्षीय संबंधांच्या आदर्शाचे उल्लंघन आहे. अशा परिस्थितीत नवी दिल्लीने बीजिंगच्या प्रतिक्रियेबाबत सतर्क असले पाहिजे. वृत्तपत्राने स्पष्टपणे लिहिले आहे की, जर चीनने चीनमधील फुटीरतावादी शक्तींना पाठिंबा दर्शविला तर चीनदेखील भारतातील फुटीरवादी सैन्यांचे समर्थन करेल.

Advertisement

वृत्तपत्राने पुढे असे लिहिले आहे की, भारताने तैवानची चिंता करू नये. वाढत्या कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराची चिंता भारताने केली पाहिजे. जेव्हा भारतातील समस्या वाढतात तेव्हा लक्ष विचलित करण्यासाठी चीनबरोबर असलेल्या तणावावर लक्ष केंद्रित करण्यास सुरवात केली जाते. भारत हा एक विकसनशील देश आहे. साथीच्या रोगातही भारत जगातील सर्वात जास्त लस बनावट आहे. मात्र, दुर्दैवाने जियोपॉलिटिकल ट्रिक्समध्ये अडकून हा देश आपलेच नुकसान करून घेत आहे.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply