Take a fresh look at your lifestyle.

IMP News : कारमध्ये मास्क वापरण्याबाबत हाय कोर्टाने दिल्यात सूचना; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी

दिल्ली :

Advertisement

सध्या मास्क ही एक अनिवार्य आणि जीवनावश्यक अशी महत्वाची गोष्ट बनलेली आहे. मात्र, मास्क वापरायचा कुठे, कशी, केंव्हा आणि कसा याबाबत हकनाक संभ्रम आहेत. अनेकदा आपण गाडीवर किंवा कारमध्ये असताना मास्क वापरावा किंवा नाही, याचाच संभ्रम असतो. अगोदर मास्क कंपल्सरी होता. मध्ये एकटे असताना तो अनिवार्य नव्हता. मात्र, आता दिल्ली उच्च न्यायालयाने याबाबत स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत.

Advertisement

त्यानुसार आता यापुढे कारमध्ये एकटे असतानाही मास्क ही गोष्ट वापरणे अनिवार्य असणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विटरवर म्हटले आहे की, मास्क ही अनिवार्य गोष्ट आहे. याबाबतदिल्ली हाय कोर्टाने म्हटले आहे की, मास्क हे एका सुरक्षा कवचाप्रमाणे काम करते. असे सुरक्षा कवच नियमितपणे वापरणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण एकटे कारमध्ये प्रवास करत असतानाही मास्क वापरावे.

Advertisement

(1) ANI on Twitter: “Delhi High Court rules mask mandatory even if a person is driving alone. It states that a mask acts as a ‘suraksha kavach’ which would prevent the spread of COVID19. https://t.co/litzyIQ4iN” / Twitter

Advertisement

एकूणच दिल्लीत असे नियम लागू झाल्यावर संपूर्ण देशभरात मास्क वापरण्याचे बंधन येऊ शकते. सध्या वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर असा नियम तुमच्या-आमच्या शहरात आज-उद्यापासून लागू होऊ शकतो. त्यासाठी आता सर्वांनी तयार असावे. मास्क वापरण्यासह सुरक्षित अंतर ठेऊन व्यवहार करण्याचीही काळजी आपल्या सर्वांना घ्यावी लागणार आहे.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply