Take a fresh look at your lifestyle.

टीम इंडियाचा ‘हा; धडाकेबाज खेळाडू ३ महिन्यानंतर मैदान गाजवण्यास सज्ज..!

मुंबई :

Advertisement

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील कसोटी मालिकेदरम्यान भारताचा धडाकेबाज खेळाडू रविंद्र जडेजाला दुखापत झाली होती. त्यानंतर तो भारतात आला आणि त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. जवळजवळ तीन महिने तो मैदानापासून दूर होता. ९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या १४ व्या सत्रात टीम इंडियाचा हा स्फोटक खेळाडू मैदान गाजवण्यास सज्ज झाला आहे.

Advertisement

आयपीएलच्या १४ व्या सत्रात चेन्नई सुपर किंग्जचा पहिला सामना १० एप्रिल रोजी खेळला जाणार आहे. हा सामना विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटलविरूद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होईल. गेल्या आयपीएलमध्ये चेन्नई संघ सातव्या स्थानावर होता, तर दिल्ली संघाने आयपीएल २०२० मध्ये उपविजेतेपद पटकावले होते. चेन्नई सुपर किंग्जने जडेजा आणि सुरेश रैना यांच्या फोटोसह ट्विट केले असून या दोन फलंदाजांनी संघात पुनरागमन केल्याचा आनंद व्यक्त केला आहे.

Advertisement

रवींद्र जडेजाची आयपीएलमधील कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. या लीगमध्ये त्याने २५.४० च्या सरासरीने आणि १२६.४७ च्या स्ट्राइक रेटने १८४ सामने खेळून २१५९ धावा केल्या आहेत. यात तो ५४ वेळा नाबाद राहिला आणि त्याने एक अर्धशतक ठोकले आहे. जडेजाची सर्वाधिक धावसंख्या ५० धावा आहे. त्याने १५७ चौकार आणि ७६ षटकार लगावले आहेत. गोलंदाजीमध्ये जडेजाने १८४ सामन्यांत ११४ बळी घेतले आहेत. त्याची सर्वोत्तम कामगिरी १६ धावा देऊन ५ बळी आहे.

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply