Take a fresh look at your lifestyle.

‘बायो-बबल’च्या आव्हानाबाबत सौरव गांगुलीने मांडले मत; परदेशींच्या तुलनेत भारतीय फ्रेश अन फिट..!


मुंबई :

Advertisement

खेळाडूंसाठी बायो-बबल आव्हानात्मक असल्याचे सांगत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाला की, भारतीय खेळाडू मानसिक आरोग्याच्या समस्येवर मात करण्याबाबत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांच्या क्रिकेटपटूंच्या तुलनेत अधिक सहनशील आहेत. कोविड काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरू झाल्यापासून खेळाडूंना बायो-बबलमध्ये राहण्यास भाग पाडले गेले आहे. जिथे त्यांचे जीवन हॉटेल्स आणि स्टेडियमपुरते मर्यादित आहे. यामुळे खेळाडू बाहेरील कोणासही भेटू शकत नाहीत. ज्यामुळे त्यांना स्वत: ला फ्रेश आणि प्रेरित ठेवणे अत्यंत अवघड बनते.

Advertisement

भारताचा विद्यमान कर्णधार विराट कोहलीनेही अलीकडे म्हटले आहे की, या परिस्थितीमुळे खेळाडूंना मानसिक त्रास होत आहे. गांगुली म्हणाला की, मला वाटते की परदेशी क्रिकेटपटूंपेक्षा भारतीय खेळाडू जास्त सहनशील आहेत. मी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीजमधील बऱ्याच क्रिकेटपटूंबरोबर खेळलो आहे. ते मानसिक आरोग्याबाबत लवकर हार मानतात. बायो-बबलमध्ये गेल्या सहा-सात महिन्यांपासून क्रिकेट चालू आहे आणि हे खूप कठीण आहे. हॉटेलच्या खोलीतून मैदानात जाणे, खेळाचा दबाव हाताळणे आणि खोलीत परत येणे आणि पुन्हा मैदानात परत येणे, हे पूर्णपणे भिन्न जीवन आहे.

Advertisement

गांगुली म्हणाला की कोविडचा धोका कायम राहील. आपल्याला सकारात्मक असावे लागेल. आपल्याला स्वत: ला मानसिकदृष्ट्या तयार करावे लागेल. आपण सर्वांनी स्वत:ला मानसिक प्रशिक्षण दिले पाहिजे. भारतीय संघाचा माजी कर्णधार म्हणाला की, २००५ मध्ये कर्णधारपदापासून दूर राहणे ही त्याच्या कारकीर्दीतील सर्वात मोठा धक्का होता. त्यानंतर मात्र त्याने संघात शानदार पुनरागमन केले. तो म्हणाला की तुम्हाला आयुष्यात अशा कठीण परिस्थितीलाही सामोरे जावे लागेल. हे आपल्या मानसिकतेबद्दल आहे. खेळ असो की व्यवसाय किंवा इतर काहीही, जीवनात आत्मविश्वास महत्वाचा आहे. प्रत्येक परिस्थितीला सामोरे
जाण्यासाठी आपल्याला तयार असले पाहिजे.

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply