Take a fresh look at your lifestyle.

शेळीपालन : खाद्य व्यवस्थापनाचे ‘हे’ मुद्दे वाचा आणि अमलातही आणा की..

शेळीपालन हा एक उत्तम व्यवसाय असला तरीही त्याबाबतीत अनेक गैरसमजही असतात. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी शेळीला गरिबांची गाय म्हटले होते. होय, अगदी गरीब आणि भूमिहीनही एक-दोन शेळ्या पाळून आपल्या घरातील दुध आणि इतर गरजा भागवू शकतात. त्यांच्या त्या म्हणण्याला हाच धागा आहे. आहाराबद्दल तर अनेक समज-गैरसमज दिसतात. त्यामुळेच राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या तज्ञांनी याबद्दल सांगितलेले महत्वाचे मुद्दे आपण पाहणार आहोत.

Advertisement

शेळीला कमी चारा लागतो असेच म्हटले जाते. मात्र, तसे काहीही नाही. कारण, वजनाच्या तुलनेत शेळीला इतर जनावरांच्या तुलनेत उलट जास्त चारा लागतो. तसेच पशुखाद्य हेही शेळ्यांना तितके जास्त गरजेचे नाही. मोठे चराऊ कुरण आणि त्यात सर्व वनस्पती व भरपूर चारा असताना शेळ्यांना पूरक पशुखाद्य द्यायलाच पाहिजे असे काहीही नाही. मात्र, चाऱ्याची उपलब्धता कमी असल्यास पशुखाद्य ही शेळ्यांच्या कळपाची गरज आहे.

Advertisement

आहार व्यवस्थापनाचे महत्वाचे मुद्दे असे :

Advertisement
  • एकूण खाद्याच्या सुमारे ८० टक्के चारा हा शेळी / बोकड झाडाचा ओरबाडून खाण्यास प्राधान्य देतात. ती त्यांची नैसर्गिक आवड आहे.
  • शेळी हा शांतपणे व उत्तम रवंथ करणारा प्राणी आहे. तिला खाल्ल्यावर व्यवस्थित रवंथ करू द्या.
  • निकृष्ठ प्रतीचा वाटणारा चाराही शेळी पचवण्यास सक्षम असते.
  • इतर प्राण्यांच्या तुलनेत शेळीला शुष्क पदार्थ गरज जास्त असते. वजनाच्या ४ % असे पदार्थ ती खाते. अनेकदा याची टक्केवारी १० पर्यंतही असू शकते.
  • शेळ्या बंदिस्त असताना त्यांना एकूण द्यावयाचा चारा ३ ते ४ वेळा विभागून दिल्यास असा चारा शेळ्यांच्या जास्त अंगी लागतो.
  • शेळी आपल्या टोकदार जीभ व ओठांमुळे अगदीच छोटे गवत आणि काटेरी झुडूपांचा पालाही सहजपणे खाऊ शकतात.
  • शेळ्यांना कोवळे गावात खायला जास्त आवडते असे आपल्याला वाटू शकते. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्या वागणूक व चारा खाण्याच्या पद्धतीचे निरीक्षण केल्यास त्यांना झाडांचा पाला जास्त खायला आवडल्याचे दिसते.
  • प्रथिनांचा वापर केलेले सकस पशुखाद्य शेळ्यांच्या चांगले अंगी लागते. त्याला त्या चांगल्या प्रतिसाद देऊन वजनाने वाढतात.
  • गाभण शेळ्यांना योग्य पद्धतीने खायला मिळत असल्याची दररोज खात्री करावी.
  • मोठी शेळी, करडे, मोठी करडे, बोकड व बेणूचा बोकड यांच्या खाद्याचे योग्य पद्धतीने नियोजन करावे.

अशा पद्धतीने शेळ्यांना सकस आहार देऊन त्यांची तब्बेत व रोगप्रतिकार शक्ती वाढेल याची काळजी घ्यावी.

Advertisement

संपादन व लेखन : सचिन मोहन चोभे

Advertisement

(क्रमशः)

Advertisement

वाचक बंधू-भगिनींनो, आपण ‘कृषीरंग’वर दररोज शेळी पालन (Goat Farming) या विषयावरील माहितीची मालिका प्रसिद्ध करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीसह जगभरातील गोट फार्मिंग ट्रेंड आणि संशोधन याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. सध्या या व्यवसायाला ‘अच्छे दिन’ आल्याच्या बातम्या माध्यमांतून येतात. अशावेळी या व्यवसायाचे वास्तव आणि व्यावहारिक भान देण्याचा हा प्रयत्न आहे. आपणास कोणत्याही सूचना व मार्गदर्शन करावेसे वाटल्यास krushirang@gmail.com या इमेलद्वारे आपण आम्हाला संपर्क करू शकता. तसेच नियमित बातम्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय न्यूज अपडेट आणि कृषी-ग्रामीण विकासाची माहिती पाहण्यासाठी आमचे www.facebook.com/Krushirang (कृषीरंग) हे फेसबुक पेज लाईक व फॉलो करा. ही माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना माहितीसाठी शेअर करा. @टीम कृषीरंग

Advertisement

Advertisement

Leave a Reply