Take a fresh look at your lifestyle.

सेबी निर्णयावर ठाम; अंबानींना बसणार झटका, सोडावेच लागणार पद

मुंबई :

Advertisement

लिस्टेड (BSE / NSE Share Market Listed) कंपन्यांना चेअरपर्सन आणि व्यवस्थापकीय संचालकाचे पद वेगवेगळे करण्याच्या स्पष्ट सूचना देतानाच त्याची कालमर्यादा अजिबात न वाढवण्याचे बाजार नियामक सेबीने (SEBI) स्पष्ट केले आहे. त्यानुसार आता अनेक दिग्गज कंपन्यांच्या दोन्ही पदावर ठाण मांडून बसलेल्या उद्योजाकांना झटका बसणार आहे. त्यात रिलायंस इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) मुकेश अंबानी यांचाही समावेश असेल.

Advertisement

देशाच्या टॉप ५०० लिस्टेड कंपन्यांपैकी केवळ ५३ टक्क्यांनी चेअरपर्सन आणि एमडीचे पद विभक्त केले आहे. हे काम एक एप्रिल २०२२ पर्यंत करण्याची कालमर्यादा देण्यात आलेली आहे. प्रथम ही मर्यादा १ एप्रिल २०२० रोजीपर्यंत होती. मात्र, कॉर्पोरेट मंडळींच्या दबावाने त्यात वाढीव कालावधी देण्यात आला. आताही त्यास वाढीव कालावधी मिळण्याची आस ठेऊन अशा दोन्ही पदांवर बसकण मारून ही मंडळी बसली होती. मात्र, कालमर्यादा कायम राहिल्याने आता त्यांना झटका बसला आहे.

Advertisement

उद्योग संघटना सीआयआयने (CII Business Conference) आयोजित ऑनलाइन परिषदेत सेबीचे चेअरमन अजय त्यागी यांनी मंगळवारी स्पष्ट केले आहे की, नियमाच्या कक्षेत येणाऱ्या सर्व लिस्टेड कंपन्यांना विनंती करतो की, शेवटची तारीख येण्याअगोदर अव्वल पदे विभक्त करावीत. जागतिक पातळीवरही कंपन्या चेअरमन व एमडी/सीईओचे पद विभक्त करण्याच्या दिशेने पुढे जात आहेत. ब्रिटन, ऑस्ट्रेलियात चर्चेचा सूर दोन्ही पदे वेगवेगळे करण्याच्या बाजूने जात आहे.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply