Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. साखर 100, तर चिकन 500 रुपये किलो; म्हणून इम्रान सरकारने दिलेय ‘महागाई गिफ्ट’..!

इस्लामाबाद :

Advertisement

पाकिस्तानात पीठ, भाज्या, अंडी आणि चिकननंतर साखरेचे दरही पेटले आहेत. राजधानी इस्लामाबादसह देशातील बर्‍याच ठिकाणी एक किलो साखर जवळपास 100 रुपयांना विकली जात आहे. पंतप्रधान इम्रान खान सरकारचा महागाई बॉम्ब रमजान दरम्यान फुटला आहे.

Advertisement

पाकिस्तानमधील गरीब लोक सध्या करोना आणि वाढती महागाई या दुहेरी संकटात आहेत. ‘नव्या पाकिस्तान’चे स्वप्न दाखवणाऱ्या पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून तेथील जनतेचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला आहे. स्वस्त दरात भारताकडून साखर खरेदी करण्याविषयी बोलणी चालू असतानाच दोन्हीकडील धार्मिक कट्टरवाद्यांनी त्यात खोडा घातल्याने दोन्ही देशातील व्यापार सुरू झाला नाही. त्याचा परिणाम म्हणून येथे प्रचंड भाववाढ झाली आहे.

Advertisement

इम्रान खान यांचे निकटचे सल्लागार शहजाद अकबर यांनी साखरेच्या वाढत्या किंमतीसाठी दलालांना दोषी ठरवले आहे. स्वत: चे सरकार असूनही त्यांनी असा दावा केला आहे की, देशात साखरेच्या कमतरतेची अफवा पसरली आहे आणि त्यामुळे भाव वाढला आहे. ते म्हणाले की, या प्रकरणात पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एफआयए) बर्‍याच लोकांवर कारवाई केली आहे.

Advertisement

पाकिस्तानच्या एआरवाय न्यूजच्या अहवालानुसार कराचीमध्ये जिवंत कोंबडीची किंमत प्रति किलो 370 रुपये आणि मांसाची किंमत 500 रुपयांवर पोहोचली आहे. स्थानिक खरेदीदारांनी कोंबडीच्या मांसाच्या किंमती वाढल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. तर लाहोरमध्ये कोंबडीच्या मांसाची किंमत प्रति किलो 365 रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

Advertisement

गेल्या महिन्यात पंतप्रधान इम्रान खान यांनी देशातील वाढती महागाई नियंत्रित करण्यासाठी पंजाब आणि खैबर पख्तूनख्वा (केपी) येथील बाजार समित्या रद्द केल्या होत्या. इमरान यांनी इस्लामाबादमध्ये अत्यावश्यक वस्तूंच्या किंमती नियंत्रणासंदर्भात बैठकीचत हा निर्णय घेतला. वास्तविक या दोन राज्यांमधून मिस गव्हर्नन्स आणि भ्रष्टाचाराच्या बर्‍याच तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे राजकीय कुरघोडी जोरात आहे.

Advertisement

आर्थिक संकटात असलेल्या या देशात जानेवारी महिन्यापासून एलपीजी गॅसच्या गंभीर संकटाचाही सामना करावा लागत आहे. पाकिस्तानमधील गॅस पुरवठा करणारी कंपनी सुई नॉर्दननला दररोज 500 दशलक्ष प्रमाण घनफूट गॅसची कमतरता भासत आहे. गॅसच्या या प्रचंड टंचाईमुळे कंपनीने वीज क्षेत्राला गॅसचा पुरवठा थांबविण्याचा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. इम्रान खान सरकारने वेळीच गॅस विकत घेतला नसल्याने त्याचा त्रास आता देशातील जनतेला सहन करावा लागत आहे.

Advertisement

महागाईने वेढलेल्या इम्रान खान यांनी डॉ. अब्दुल हफीज शेख यांना नवीन अर्थमंत्री म्हणून जबाबदारी दली आहे. परंतु, असे असूनही महागाई वेगाने वाढत आहे. 2018 मध्ये इम्रान खान सत्तेत आल्यापासून अझहर हे अर्थमंत्रीपद भूषवणारे तिसरे मंत्री आहेत.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply