Take a fresh look at your lifestyle.

आश्चर्यच की.. ‘त्या’ मार्गाने TMC नेत्याच्या घरी पोहोचले EVM यंत्र..!

कोलकाता :

Advertisement

भाजप उमेदवाराच्या गाडीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र अर्थात EVM सापडल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी चौघावर निवडणूक आयोगाने कारवाई केलेली असतानाच आता तृणमूल काँग्रेस पक्षाच्या एका स्थानिक नेत्याच्या घरीही EVM सापडल्याने आणखीनच गोंधळ उडाला आहे. याप्रकरणी सेक्टर अधिकारी यांच्यासह पोलिसांच्या तुकडीलाचा निलंबित करण्यात आलेले आहे.

Advertisement

पश्चिम बंगालमधील हुगळी, हावडा आणि दक्षिण 24 परगणा या तीन जिल्ह्यांमध्ये 31 जागांवर मतदान सुरू आहे. दरम्यान, हावडाच्या उल्बेरियात टीएमसी नेत्याच्या घरी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची दखल घेत निवडणूक आयोगाने सेक्टर अधिकारी तपन सरकार यांना निलंबित केले आहे. आयोगाने म्हटले आहे की हे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट्स आता निवडणूक प्रक्रियेतून हटविण्यात आले आहेत. या प्रकरणात सामील असलेल्या सर्वांवर कडक कारवाई केली जाईल.

Advertisement

विधानसभा मतदारसंघाच्या 177 च्या सेक्टर 17 मध्ये ग्रामस्थांनी टीएमसी नेते गौतम घोष यांच्या घरातून ईव्हीएम आणि चार व्हीव्हीपॅट मशीन जप्त केल्या आहेत. सुरुवातीच्या तपासणीत निवडणूक आयोगास असे आढळले आहे की, तपन सरकार हे रिझर्व्ह ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटसह त्यांच्या क्षेत्रामध्ये उपस्थित होते. मतदानाच्या आदल्या रात्री ते आपल्या नातेवाईकाच्या घरी झोपायला गेले. त्यावेळी काळजी म्हणून त्यांनी त्या मशीन आपल्याबरोबर नेल्या. मात्र, हे नातेवाईक कोणी दुसरे नाही तर टीएमसी पक्षाचे नेते होते.

Advertisement

सेक्टर अधिकारी तपन सरकार यांच्यासह संपूर्ण पोलिस बंदोबस्तावरील टीमला निलंबित करत आयोगाने कठोर कारवाई केली आहे. दरम्यान, दक्षिण 24 परगणा येथील कॅनिंग पश्चिम विधानसभा मतदारसंघात हुगळीमध्ये भाजपा समर्थकाच्या पत्नीची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. दुसरीकडे दुर्गापूरच्या कॅनिंग ईस्टमध्ये आयएसएफ आणि टीएमसीचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले होते. त्याचवेळी रायडीघी विधानसभा मतदार संघात टीएमसीने पोस्टर फाडल्याचा आरोप भाजपने केला आहे. टीएमसी गुंड मतांना परवानगी देत ​​नाहीत अशी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply