Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : पहा खुद्द पुजाराने काय दिलीय कबूली; पंतबाबतही त्याने म्हटलेय असे..!


मुंबई :

Advertisement

यंदाचे आयपीएल भारतातील युवा खेळाडूंसाठी तसेच कसोटीतज्ञ चेतेश्वर पुजारासाठी खूप खास आहे, कारण त्याला या स्पर्धेत ७ वर्षांनंतर खेळण्याची संधी मिळत आहे. पुजाराला चेन्नई सुपर किंग्ज संघाने त्याच्या बेस प्राइस ५० लाखात खरेदी केले आहे. त्याने अखेरचा आयपीएल सामना २०१४ मध्ये खेळला होता. यावेळी स्वत: ला पुन्हा सिद्ध करण्यासाठी पुजारा मैदानात जोरदार सराव करीत आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी पुजाराने त्याचा आवडता शॉट कोणता हे सांगितलं आहे.

Advertisement

ईसीपीएन क्रिकइन्फोशी बोलताना ३३ वर्षीय भारतीय फलंदाजाने सांगितले की, त्याला फाईन लेगला स्कूप शॉट्स खेळायला आवडते आणि आयपीएलमध्ये या शॉटमुळे त्याला अनेक धावा मिळवता आल्या आहेत. पुजाराने हा त्याचा आवडते शॉट असल्याचे वर्णन केले आहे. मात्र ऋषभ पंतसारखा तो रिव्हर्स स्कूप शॉट खेळू शकत नाही, अशी कबुलीही त्याने येथे दिली आहे.

Advertisement

पंत खूप आक्रमक खेळाडू असून त्याने आपला खेळ बदलू नये, असे सांगून पुजाराने ऋषभ पंतची प्रशंसा केली. पुजारा म्हणाला, पंतला परिस्थितीनुसार फलंदाजी करावी लागेल. जर त्याला असे खेळायचे असेल तर काय हरकत आहे ? त्याच्या अशा खेळण्यामुळेच तो यशस्वी झाला आहे. ड्रेसिंग रूममध्ये त्याच्या अद्वितीय शॉट्समुळे आम्ही सर्वजण थक्क झालो, यामुळे तो वेगळा असल्याचे पुजारा म्हणाला.

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी 

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply