नागपूर :
सध्या उन्हाळ्यात पुन्हा एकदा विदर्भातील जंगलात मोहाच्या फुलाच्या वेचनीला सुरुवात झाली आहे. वन आणि वन्यजीव विभागाच्या अखत्यारीत असलेल्या जंगलात याची वेचणी आदिवासी महिला आणि चिमुरडे करीत आहेत.
आदिवासींचा कल्पवृक्ष असलेल्या मोहाच्या फुला-फळांपासून भाकरीची सोय होईल इतपत पैसे मिळत असल्याने हे झाड आदिवासींसाठी वरदान समजले जाते. सह्याद्री, सातपुडा व विंध्य पर्वतातील जंगलात मोहाची झाडे आढळतात. त्याची फुले, फळे, पाने, साल, लाकूड, मुळे, फांद्या या सर्वांचा वापर होत असल्याने त्याला खूप मागणी असते. मोहाच्या फुला-फळांपासून आदिवासींना रोजगार मिळत आहे.

मोहाच्या झाडाचे महत्वाचे मुद्दे असे :
- या फुलांत साखर आणि अल्कोहोलचे प्रमाण चांगले असल्याने आदिवासी मद्य बनवितात. तसेच काही कंपन्याही त्याचा व्यावसायिक वापर करतात. यातील ‘ब’ जीवनसत्त्व असल्याने कोणत्याही आजारात आदिवासी जमाती मोहाच्या दारूचा औषध म्हणून उपयोग करतात.
- फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये मोहाची फुले बहरतात. त्यामध्ये ६७.९% अल्कोहोलचे प्रमाण असते. एक टन मोह फुलांपासून सुमारे ३४० लिटर शुद्ध अल्कोहोल मिळते.
- मोहाची फुले पहाटे गोळा करतात आणि ती वाळवून,साठवून ठेवतात. रोख पैशांची गरज असेल तेव्हा बाजारात विकतात. मोहाच्या फळामध्ये असणाऱ्या बीजाला टोळी असे म्हणतात. या बीपासून तेल काढले जाते.
- बियांचे तेलही आदिवासी भाज्यांसाठी, दिव्यासाठी आणि त्वचारोग व डोकेदुखीवरील विविध प्रकारच्या औषधांत या तेलाचा उपयोग केला जातो. पानांचे द्रोण व पत्रावळी केल्या जातात.
- महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश या भागांतील शेतकरी गायी-गुरांना मोहाच्या पानांचा सकस आहार देतात. त्यामुळे दुभती जनावरे भरपूर दूध देतात.
- बहुतेक आदिवासींचे सण/धार्मिक कार्यक्रम या झाडाच्या फुलांपासून बनविलेल्या दारूशिवाय (मोहाची दारू) पूर्ण होत नाहीत. पोलो हा सण साजरा करून फुले गोळा करण्याला सुरुवात करतात.
- अनेक संशोधनांमध्ये मोहाच्या फुलामध्ये जिवाणुरोधक, कृमिघ्न, वेदनाशामक, यकृताच्या व्याधीमध्ये उपयुक्त, कर्करोगविरोधी गुणधर्म असल्याचे पुढे आले आहे.
- फुलांच्या रसात प्रथिनांचे प्रमाण अधिक असून टॉनिक म्हणून उपयुक्त आहे. दाह होत असलेल्या त्वचेवर चोळल्यास गुणकारी असते. डोळ्यांच्या रोगामध्ये व रक्तपित्तातील रक्तस्राव रोखण्यासाठी फायदेशीर आहे. पित्तामुळे होणारी डोकेदुखी कमी करण्यासाठी याचे नस्य केले जाते.
- फुलांची भुकटी हगवण, बृहदांत्र शोथावर स्तंभक म्हणून वापरली जाते. तर, कच्ची फुले स्तनदा मातांच्या दुधामध्ये वृद्धीसाठी उपयुक्त असतात.
- कफ, खोकला आणि दम्यासाठी भाजलेली फुले वापरली जातात. वंध्यत्व आणि दुर्बलता विकारांमध्ये दुधामध्ये मिसळून फुलांचा वापर केला जातो. तुपामध्ये तळून फुलांचा वापर मूळव्याधीच्या उपचारामध्ये केला जातो.
संपादन : माधुरी सचिन चोभे
कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..
- कोविड ज्ञान : ऑक्सिजनचा वापर आणि करोना कोणत्या ठिकाणी पसरतो, याची माहिती नक्की वाचा
- म्हणून रात्री झोपण्याअगोदर प्यायचा असतो गुळ; पहा कोणते फायदे होतात या सध्या गोष्टीमुळे
- या 5 गोष्टी खा आणि उन्हाळ्यात वजन कमी करा; ‘चरबीवान’ मंडळींसाठी आहे ही खास माहिती
- IPL 2021 : दिल्ली कॅपिटल Vs पंजाब किंग्जचे संघ भिडणार; पहा काय असेल प्लेइंग इलेव्हनची लिस्ट
- IPL 2021 : मॉर्गनसमोर असेल कोहलीचे आव्हान; पहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन कोण ते