Take a fresh look at your lifestyle.

नगर दक्षिणेत नेमका कोण भारी..; कारण निधीच्या क्रेडीटसाठी सुरू झालीय साठमारी..!

अहमदनगर :

Advertisement

जिल्ह्यात सध्या निधीचे राजकारण सुरू झालेले आहे. आमदार आणि खासदार यांच्यासह सर्वजण आपण किंवा आपल्या नेत्याने कसा स्थानिक भागातील विकासासाठी निधी मिळवला आहे, त्याबाबतचे दावे करीत आहे. त्यात सर्वात आघाडी घेतली आहे ती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आणि आमदार रोहित पवार यांनी. दोन्ही युवा नेत्यांनी आपणच निधी आणल्याचे दावे करणाऱ्या प्रेसनोट फिरवल्या आहेत.

Advertisement

विखे पाटील यांनी म्हणाले आहे की, आढळगाव ते जामखेड (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 561) रस्त्याच्या 63 किलोमीटरसाठी सुमारे  जवळपास 400 कोटी निधी मिळाला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी केलेल्या पाठपुरव्याला  यश मिळाले. अहमदनगर येथील उड्डाणपूल, नगर शिर्डी रस्ता याबरोबरच कर्जत-जामखेड या तालुक्यांमध्ये महत्त्वाचा असणार न्हावरा फाटा-जामखेड टप्पा 2 या रस्त्याच्या कामसंदर्भात मागील काही आठवड्यात गडकरी यांच्या संपर्कात राहून रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर करून आणला. न्हावरा फाटा ते श्रीगोंदा काष्टी टप्पा 1 कामाची मंजुरी मिळालेली आहे. त्याचे काम यापूर्वीच सुरू झाले असून ते काम प्रगतिपथावर आहे. गडकरी यांनी भाग 2 ची मंजुरी दिल्यामुळे आढळगाव ते जामखेड या कामाची लवकरच सुरुवात होईल.

Advertisement

तर, यापूर्वीचा गडकरी यांच्यासोबतच फोटो टाकून आमदार पवार यांनी म्हटलेले आहे की, न्हावरा-इनामगाव-काष्टी-श्रीगोंदा-जळगाव-जामखेड या राज्यमहामार्गाला नुकताच राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे. या मार्गातील आढळगाव ते जामखेड या ६२.७७ किलोमीटर मार्गाचे दोन लेनमध्ये चौपदरीकरण होणार आहे. या कामासाठी ३९९.३३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यामुळे मतदारसंघाचे भाग्य उजळले आहे. यासाठी गडकरी यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता. प्रवासी वाहतूकीसह कारखानदारी वाहतूकीसाठीही हा मार्ग महत्वाचा ठरणार आहे. केवळ इतकेच नव्हे तर नगर-सोलापूर ५१६ (अ) या नवीन चौपदरी राष्ट्रीय महामार्गाच्या कामात असणारे अडथळे देखील दूर होऊन या कामाची निविदा निघाली आहे. नगर-सोलापूर व आढळगाव ते जामखेड हे दोन्ही राष्ट्रीय महामार्ग तालुक्याच्या व एकंदरीतच जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणारे ठरणार आहेत.

Advertisement

एकाच कामावर या दोन्ही युवा नेत्यांनी आपणच हा निधी मिळवल्याचा दावा केलेला आहे. दरम्यान, दोघांनीही निधी आणलेला असो, नाहीतर यापैकी एकाच्या शब्दाला गडकरी साहेबांनी मान दिलेला असो. तालुक्यातील रस्त्याची दैना फिटणार असल्याने सामान्य नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. तर, भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आपल्याच नेत्याला याचे क्रेडीट देण्यासाठी सोशल मिडीयामध्ये एकमेकांवर तुटून पडत आहेत.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply