Take a fresh look at your lifestyle.

धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटने प्रेरित चॉकलेट लॉन्च; पहा कुठे व्यावसायिक भागीदार बनलाय माही


मुंबई :

Advertisement

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी फूड ॲन्ड ड्रक्िंस स्टार्टअप ‘सेव्हन इंक र्ब्यूज’चा भागीदार बनला आहे आणि त्याने स्वत: च्या प्रसिद्ध हेलिकॉप्टर शॉटद्वारे प्रेरित चॉकलेट देखील बाजारात आणली आहे. मुंबईस्थित कंपनीची स्थापना मोहित भागचंदानी आणि सहसंस्थापक आदिल मिस्त्री आणि कुणाल पटेल यांनी केली आहे.

Advertisement

धोनीच्या हेलिकॉप्टर शॉट आणि त्याच्या जर्सीमुळे प्रेरित ‘कॉपर सेव्हन’ या ब्रँडखाली चॉकलेट आणि पेय (अल्कोहोलिक व नॉन-अल्कोहोलिक) याची नवीन श्रेणी सुरू करण्यात आली. धोनी म्हणाला, ”जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीच्या दृष्टीकोनातून प्रभावित होता तेव्हा ही भागीदारी अधिक अर्थपूर्ण बनते. या कंपनीचा भागीदार झाल्याने मला फार आनंद होत आहे. ”मुंबई, पुणे, गोवा आणि बेंगळूरूसह ही उत्पादने उत्तर प्रदेश, हरियाणा, झारखंड, पंजाब आणि चंदीगड येथेही बाजारात आणली जातील.

Advertisement

धोनीच्या एका शॉटने प्रेरित होत चॉकलेट ब्रॅण्ड देशात लॉन्च झाल्याने त्याची लोकप्रियता कळून येते. रांचीचा माही हा भारताचा एक यशस्वी कर्णधार व आक्रमक फलंदाज आणि चतुर यष्टीरक्षक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ मध्ये टी २० तर आणि २०११ मध्ये वनडे विश्वचषक पटकावला आहे. सोबत २०११ मध्ये चॅम्पियन्स करंडक तसेच २०१०, २०११ आणि २०१८ मध्ये आयपीएल चषक जिंकला आहे. सोबतच २ चॅम्पियन्स लीग टी २० विजेतेपद (२०१०, २०१४) पटकावले आहे. धोनीच्या नावावर आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार ७७३ एकदिवसीय धावा आणि विकेट मागे ४४४ बळी, तसेच ४,८७६ कसोटी धावा आणि विकेट मागे २९४ बळी आणि १,६१७  टी २० धावा आणि विकेटच्या मागे ९१ बळी अशा विक्रमाची नोंद आहे.  

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी 

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply