Take a fresh look at your lifestyle.

म्हणून अनिल कुंबळे झालाय शाहरुख खानचा चाहता; म्हणाला ‘देतो पोलार्डची आठवण..’

मुंबई :

Advertisement

पंजाब किंग्जचा युवा फलंदाज शाहरुख खानचे दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे याने कौतुक केले आहे. कुंबळेने पाच वेळा आयपीएल चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्स संघासोबत असतानाचा अनुभव शेअर केला आहे. अनिल कुंबळे म्हणाला, शाहरुख खान मला वेस्ट इंडीजचा फलंदाज किरोन पोलार्डची थोडीशी आठवण करून देतो. जेव्हा मी मुंबई इंडियन्समध्ये होतो, तेव्हा पोलार्ड नेटमध्ये असाच खतरनाक खेळायचा.

Advertisement

कुंबळे पुढे म्हणाला, मी त्यावेळी नेटमध्ये खूप गोलंदाजी करायचो. मी पोलार्डला सरळ शॉट्स जास्त मारू नको असे सांगायचो, कारण मी त्याने सरळ शॉटस मारल्यावर बॉल पकडण्याचा अजिबात प्रयत्न करायचो नाही. आता मी वयस्कर झालो आहे आणि माझे शरीर मला साथ देत नाही. शाहरुख फलंदाजी करणार असेल तर मी नेटमध्ये गोलंदाजी करणार नाही. हे अगदी निश्चित आहे.

Advertisement

चेन्नईत जन्मलेल्या शाहरुखला प्रीती झिंटाच्या टीमने यंदाच्या आयपीएल लिलावात ५.२५ कोटीमध्ये खरेदी केले होते. यावेळी दिल्ली कॅपिटल आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा संघही शाहरुखला घेण्याबाबत इच्छुक होते, पण शेवटी ही बाजी पंजाब किंग्सने मारली. पंजाबने विकत घेतल्यानंतर शाहरुख म्हणाला की, माझ्याशी संपर्क साधण्यासाठी आयपीएलच्या फ्रँचायझींमध्ये स्पर्धा होती, याबद्दल मला आश्चर्य वाटले.

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी 

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply