Take a fresh look at your lifestyle.

राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मांडले ‘हे’ महत्वाचे मुद्दे

मुंबई :

Advertisement

महाराष्ट्रातील वाढत्या करोना रुग्णांसह राजकीय घडामोडींवर भाष्य करताना आज पुन्हा एकदा मनसेप्रमुख राज ठाकरे कडाडले आहेत. त्यांनी या मुद्द्यावर आपल्या स्टाईलने भूमिका मांडली आहे.

Advertisement

ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे असे :

Advertisement
 • पुन्हा कठोर लॉकडाऊन आला, तर परिस्थिती कठीण असेल. त्यामुळं आतातरी किमान नागरिक कोरोनावरील निर्बंध पाळावेत.
 • कोरोना लसीकरण प्रक्रियेत वयाची मर्यादा नसावी.
 • मनसे पदाधिकाऱ्यांच्या हत्या प्रकरणावरुन राष्ट्रवादीच्या नजीब मुल्ला यांच्यावर कारवाईसाठी लवकरच शरद पवारांचीही भेट घेणार.
 • सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा. एकदा शेतकरी कोसळला तर पुन्हा संकट आपल्यावर येईल.
 • सराव करणाऱ्या सर्व खेळांडूना परवानगी मिळावी.
 • सलून, ब्युटी पार्लरला आठवड्याला दोन ते तीन दिवस उघडे ठेवण्याची परवानगी असावी.
 • कंत्राटी कामगार सरकारने घेतलले होते. त्यांच्याकडे विषयाकडे लक्ष द्याववे.
 • व्यायसायिकांना वीज बिल माफी द्यावी.
 • निर्बंधांच्या काळातील वीज बिल सरकारने माफ करावे.
 •  सरकारने बँकांशी बोलून घ्यावे. बँका सक्तीने पैसे वसूल करत आहेत.
 •  हॉस्पिटल्समध्ये बेड उपलब्ध असतील तर नागरिकांना सुविधा मिळाव्यात.
 • छोट्या व्यापाऱ्यांनी केलेले उत्पादन विकण्याचा प्रश्न आहे. त्याकडे लक्ष द्यावे.

संपादन : विनोद सूर्यवंशी  

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply