Take a fresh look at your lifestyle.

शेळीपालन : मोठ्या कराडांना द्या ‘हा’ खुराक; वाचा नफा वाढवणारी माहिती

छोट्या करडांना बाळसुग्रास देण्याविषयीची माहिती आपण पाहिली. आता आपण ३ महिन्यांपेक्षा मोठ्या कराडांना द्यायच्या खाद्याची माहिती पाहणार आहोत. कारण, छोटी करडे तरी वेगाने वाढतात. मात्र, पुढे मग अशा कराडांना ९ महिन्यांपर्यंत वाढवताना त्यांची वजनवाढ योग्य पद्धतीने होणे हेही आवश्यक असते. कारण हीच एकमेव गोष्ट नफा वाढवणारी आहे.

Advertisement

तीन महिने वयाच्या कराडांना देण्याचा खुराक तयार करण्याचे घटक आणि त्याची टक्केवारी अशी :

Advertisement
  • मका भरडा : २०%
  • डाळ चुनी ३२%
  • भुईमुग पेंड १५%
  • गव्हाचा कोंडा ३०%
  • क्षार मिश्रण २.५%
  • मीठ ०.५%

अशा पद्धतीने यामध्ये १४ टक्के पचवू शकणारी कच्ची प्रथिने आणि 65 टक्के एकूण पचनीय पदार्थ असलेला खुराक द्यायचे नियोजन करावे. तसेच या मोठ्या कराडांना वळलेला आणि हिरवा चारा देऊन तयार करावे.

Advertisement

शेळ्या व बोकड यांच्या चंचल स्वभावानुसार त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये होणारे बदल लक्षात घ्यावेत. कारण, अनेकदा काहीही किरकोळ कारणाने किंवा हवामानाच्या बदलानेही त्यांच्या खाण्यापिण्याच्या पद्धतीमध्ये बदल होऊ शकतात. अशावेळी त्यांनी पोटभर नाही खाल्ले तर जाप्ता बिघडू शकतो. तसेच आहाराकडे लक्ष देण्याबरोबरच आरोग्याची काळजीही घ्यावी. त्यासाठी वेळोवेळी पशुवैद्यकीय तज्ञ किंवा अनुभवी व्यक्ती यांची गोठ्यामध्ये भेट होईल असे पाहावे.

Advertisement

संपादन व लेखन : सचिन मोहन चोभे

Advertisement

(क्रमशः)

Advertisement

वाचक बंधू-भगिनींनो, आपण ‘कृषीरंग’वर दररोज शेळीपालन (Goat Farming) या विषयावरील माहितीची मालिका प्रसिद्ध करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीसह जगभरातील गोट फार्मिंग ट्रेंड आणि संशोधन याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. सध्या या व्यवसायाला ‘अच्छे दिन’ आल्याच्या बातम्या माध्यमांतून येतात. अशावेळी या व्यवसायाचे वास्तव आणि व्यावहारिक भान देण्याचा हा प्रयत्न आहे. आपणास कोणत्याही सूचना व मार्गदर्शन करावेसे वाटल्यास krushirang@gmail.com या इमेलद्वारे आपण आम्हाला संपर्क करू शकता. तसेच नियमित बातम्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय न्यूज अपडेट आणि कृषी-ग्रामीण विकासाची माहिती पाहण्यासाठी आमचे www.facebook.com/Krushirang (कृषीरंग) हे फेसबुक पेज लाईक व फॉलो करा. ही माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना माहितीसाठी शेअर करा. @टीम कृषीरंग

Advertisement

Advertisement
1 Comment
  1. Dnyandip khatik says

    शेळीपालन बदल खूप महत्वाची माहिती दिल्याबद्ल आभार 🙏.

Leave a Reply