Take a fresh look at your lifestyle.

पंढरपूर पोटनिवडणूक : ‘त्या’ गुप्त बैठकीने चर्चेला उधाण; राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ

सोलापूर :

Advertisement

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीतर्फे भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारात मागील दोन दिवसांपासून सक्रीय असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार समर्थक आमदार संजय शिंदे यांनी भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासमवेत गुप्त बैठक झाल्याच्या बातमीने महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडाली आहे.

Advertisement

अनेक वृत्तपत्रांनी याच्या फोटोसह बातम्या प्रसिद्ध केलेल्या आहेत. त्यात ‘आमदार संजय शिंदे आणि भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची सोमवारी कल्याण काळे यांच्यासमवेत गुप्त बैठक’अशा अर्थाने सोशल मिडीयामध्ये चर्चाही सुरू झालेली आये. या तिघांनीही गुप्त बैठकीचा तपशील जगजाहीर केलेला नाही. तसेच याप्रकरणी अजूनही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Advertisement

 भालके यांच्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, पालक मंत्री दत्ता भरणे यांच्यासह अनेक नेते सोलापुर जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांच्यासह सिद्धेश्वर अवताडे आणि इतरांनी राष्ट्रवादीची ही जागा आपल्याकडे घेण्यासाठी जोरदार प्रचार सुरू केलेला आहे. दुसरीकडे भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर व बाळा भेगडे यांनीही भाजपच्या विजयासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

Advertisement

जयंत पाटील आणि कल्याणराव काळे यांची गुप्त बैठक घेण्यासाठी प्रयत्न केल्याची चर्चा होती. याच दरम्यान खासदार निंबाळकर आणि आमदार शिंदे यांच्यात गुप्त बैठक कल्याणराव काळे यांच्या उपस्थितीत झाल्याची चर्चा सुरू झाल्याने नेमका कोण नेता कोणाकडे आहे आणि कोणाला त्यांचे कार्यकर्ते मतदान करून निवडून आणणार यावर चर्चेला उत आलेला आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply