Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. झेडपीमध्ये द्यावी लागते टक्केवारीच; सत्ताधारी शिवसेना सदस्यांनी केलाय आरोप

सोलापूर :

Advertisement

जिल्हा परिषद ही यंत्रणा पैसे खाण्यात आणि भ्रष्टाचार करण्यात राज्य सरकारच्या महसूल आणि पोलीस यंत्रणेच्या अजिबात मागे नसल्याचे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे. आताही सोलापूर जिल्हा परिषदेतील सत्ताधारी शिवसेनेच्या ज्येष्ठ महिला सदस्यांनी हाच मुद्दा अधोरेखित करीत बांधकाम विभागात टक्केवारीशिवाय कामच केले जात नसल्याचा धक्कादायक आरोप केला आहे.

Advertisement

वीट जिल्हा परिषद गटातील शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या लक्ष्मी आवटे यांनी थेट पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात टक्केवारी दिल्याशिवाय एकही काम होत नाही. आमच्या पक्षाचे असूनही जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी आपल्या गटात एकही काम केलेले नाही. मोठ्या विश्वासाने आम्ही कांबळे यांना जिल्हा परिषद अध्यक्ष केले. मात्र त्याची जाणीव कांबळे यांना राहिली नाही.

Advertisement

आवटे व अनिरुद्ध कांबळे हे शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांच्याच गटाचे  असतानाही असे आरोप होत असल्याने अनेकांना धक्का बसला आहे. एकूणच सत्ताधारी शिवसेनेत सर्व आलबेल नसून त्याचा फटका या पक्षाला बसणार असेच यानिमित्ताने स्पष्ट झाल्याची चर्चा आहे. कोरोनाच्या नावाखाली निधी नसल्याचे बोलतात. पण दुसरीकडे निधी देताना कोरोना नसतो. शिवसेनेच्याच सदस्यांची कामे आडवली जात आहेत. जिल्हा परिषद सदस्यांना जर टक्केवारी द्यावी लागत असेल तर दुर्दैव आहे, असे मत आवटे यांनी व्यक्त केले आहे.

Advertisement

दरम्यान, यावर प्रतिकिया देताना अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी म्हंटले आहे की, कोरोनामुळे वर्षभर निधी उपलब्ध नव्हता. टक्केवारी तसेच काम करत नसल्याचे आरोप गैरसमजातून झाले आहेत. आता आचारसंहिता असल्याने ती संपल्यानंतरच पुढील कामे निघणार आहेत. त्यात तालुक्याला झुकते माप देण्याचा प्रयत्न राहील.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply