Take a fresh look at your lifestyle.

मंत्री गडाखांना करोनाबाधा; पहा उस्मानाबाद शिवसेनेने काय प्रत्युत्तर दिलेय भाजपला

उस्मानाबाद / अहमदनगर :

Advertisement

‘पालकमंत्री महोदय, ‘शंकरा’प्रमाणे तिसरा डोळा उघडून करोनाचा नायनाट करा. गायब न होता जिल्ह्यात येऊन उपाययोजना करा’, असे जाहीर निमंत्रण उस्मानाबाद येथील भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी दिले होते. दरम्यान, पालकमंत्री शंकरराव गडाख यांना करोनाची बाधा झालेली असताना विरोधकांनी असे पत्र काढल्याबद्दल शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमाणी यांनीही विरोधकांना सुनावले आहे.

Advertisement

गडाख यांना कोरोनाची लागण झाली असून, ते सध्या घरीच विलगीकरणामध्ये उपचार घेत असल्याची माहिती देतानाच सोमाणी म्हणाले की, दररोज जिल्ह्याच्या कोरोनाच्या परिस्थितीचा नियमित आढावा घेत आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी संबंधित यंत्रणेशी सातत्याने संवाद साधून उपाययोजना राबवण्याचे काम पालकमंत्री गडाख अत्यंत प्रामाणिकपणे करत असताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांना या काळाचे गांभीर्य दिसत नाही.

Advertisement

गळ्यांनी मिळुन कोरोनाच्या संकटाचा सामना करायचा आहे. राजकारण करण्यासाठी आपल्याला भरपुर वेळ असून त्यावेळी आम्ही खंबीर आहोतच पण अशा गंभीर गोष्टीत राजकारण आणू नये, पालकमंत्रीगडाख तत्पर आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षमपणे काम करत आहे. त्यात अडचण येणार नसल्याचा विश्वास सोमाणी यांनी व्यक्त केला आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply