Take a fresh look at your lifestyle.

राफेल सौदा : ‘मीडियापार्ट’च्या बातमीने उडाली खळबळ; भाजपने केला ‘हा’ महत्त्वपूर्ण दावा

दिल्ली :

Advertisement

राफेल लढाऊ विमान सौद्यात भ्रष्टाचार झाल्याचे अाराेप पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आहेत. फ्रान्सच्या भ्रष्टाचारविरोधी ‘एएफए’ संस्थेने दसॉल्ट कंपनीच्या खात्यांचे ऑडिट केल्यानंतर असे स्पष्ट झालेले आहे की, भारत-फ्रांस यांच्यातील करार आणि कंपनीने विमाने देतात २०१७ मध्ये ‘गिफ्ट टू क्लायंट्स’ म्हणून रक्कम हस्तांतरित केली होती.

Advertisement

फ्रेंच माध्यम समूह ‘मीडियापार्ट’ने यावर बातम्या प्रसिद्ध केलेल्या आहेत. त्यानुसार राफेल तयार करणारी फ्रेंच कंपनी दसाॅल्टने भारतात एका मध्यस्थाला १० लाख यूरो (सुमारे ८.५ कोटी रुपये) ‘भेट’ दिएल्ले आहेत. २०१६ मध्ये भारत-फ्रान्सदरम्यान राफेल विमानांबाबत झालेल्या करारानंतर दसॉल्टने भारतात एका मध्यस्थाला ही रक्कम दिली.

Advertisement

गौप्यस्फोटानंतर दोन्ही देशांत राफेल सौद्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच काँग्रेस पक्षाने हा मुद्दा लावून धरला आहे. चौकशीची मागणी करत पंतप्रधान नरेंद्र माेदींना काँग्रेस पक्षाने प्रश्न केले आहेत. दरम्यान,  केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी यावर म्हटले आहे की, सुप्रीम काेर्टात साैद्यात चौकशीची मागणी फेटाळण्यात आली आहे. कॅगलाही यात गैरव्यवहार आढळला नाही. ताजे अाराेप फ्रान्समधील काॅर्पाेरेट शत्रुत्वामुळे झालेले असू शकतात.

Advertisement

दरम्यान, दसॉल्ट कंपनीने यावर म्हटले आहे की, ही रक्कम राफेल विमानच्या ५० मोठ्या ‘प्रतिकृती’(मॉडेल) तयार करण्यात खर्च झाली हाेती. तथापि, बातम्यांत म्हटले आहे की, हे माॅडेल तयार केल्याचे कोणतेही पुरावे दाखवले नाहीत. त्यामुळे या खरेदीमध्ये पैशांची ही रक्कम नेमकी कशासाठी ‘गिफ्ट’वर खर्च झाली यावरून भारत आणि फ्रांस या दोन्ही देशात राजकीय चर्चांना उधाण आलेले आहे.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी   

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply