वाझेप्रकरणी ‘ते’ ३ मंत्रीही भाजपच्या रडारवर; पहा सोमय्या यांनी उपस्थित केलेले मुद्दे
औरंगाबाद :
स्फोटकांच्या कारसह एका हत्येच्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सचिन वाझे याला अटक केली होती. त्यानंतर आता या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था करीत आहे. त्यातच १०० कोटींच्या प्रकरणी गृहमंत्री पदावरून अनिल देशमुख यांना पायउतार व्हावे लागलेले आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या भाजपने आता आणखी ३ मंत्र्यांना घरी पाठवण्याचा विडा उचलला आहे.
अाैरंगाबादेतील पत्रकार परिषदेत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी साेमवारी अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. याप्रकरणी गृहमंत्र्यांची पाठराखण करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अाता महाराष्ट्राची माफी मागावी, अशीही मागणी सोमय्या यांनी केली आहे.
बडतर्फ पाेलिस अधिकारी सचिन वाझेप्रकरणी बोलताना सोमय्या पुढे म्हणाले की, वाझे याची २० जून २०२० नंतर नियुक्तीची फाइल क्राइम ब्रँचमार्गे ‘आयसीयू’त गेली म्हणजेच गायब झाली आहे. ठाकरे सरकारचा वसुलीचा धंदा पूर्ण बाहेर आल्यानंतर अजून धक्कादायक माहिती बाहेर येईल. उच्च न्यायालयाचे आदेश डावलून ठाकरे सरकारने वाझेंची नियुक्ती केल्याने त्यांनी न्यायालयाचा अवमान केल्याकडेही सोमय्या यांनी लक्ष वेधले आहे.
यावेळी खासदार डाॅ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर, अाेबीसी मोर्चाचे राज्य सचिव बापू घडमोडे, अनिल मकरिये, समीर राजूृरकर, प्रशांत देसरडा आदी उपस्थित होते. सोमय्या पुढे म्हणाले की, वाझेच्या वसुलीचे प्रकरण संपणार नाही, तर शिवसेेनेचे राज्यमंत्री अनिल परब यांच्यासह अजून तीन मंत्र्यांचा संबंधही लवकरच स्पष्ट होईल. टीआरपी घोटाळा, मनी लाँडरिंग, बिटकॉइन, पोलिसांच्या बदल्यांसह अनेक प्रकरणांत २० हजार कोटींवर आर्थिक गैरव्यवहार झाला अाहे. एनआयएच्या तपासात विविध एजन्सी सहभागी होतील तेव्हा अनेक मंत्र्यांचा घोटाळ्यातील सहभाग स्पष्ट होईल.
संपादन : विनोद सूर्यवंशी
कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..
- इन्शुरन्स विकत घेताना घ्या काळजी; नाहीतर भविष्यात बसू शकतो ‘तसा’ही भुर्दंड..!
- घर सजावट आणि आरोग्य : ‘त्या’ चार झाडांची रोपे देतील ‘सुकून की निंद’..!
- NTPC मध्ये नोकरीची संधी; पहा काय आहेत नियम आणि पात्रतेच्या अटी
- मोदी सरकारने घेतले ‘ते’ महत्वाचे निर्णय; करणार ऑक्सिजन व रुग्णांच्या सोयीसाठीची तरतूद
- महाराष्ट्रात सुरू आहे ‘अशी ही पळवापळवी..’; सोमय्यांनी वेधले ‘त्या’ मुद्द्याकडे लक्ष