Take a fresh look at your lifestyle.

महत्वाची बातमी : आयपीएल स्पर्धा रद्द होण्याच्या मुद्द्यावर पहा काय म्हणालाय गांगुली..!


मुंबई :
राज्यासह देशात कोरोनाबाधितांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत असून यामुळे देशभर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक राज्यांनी लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यात इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामात भाग घेणारे अनेक क्रिकेटपटू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांनाही कोरोनाचा फटका बसला आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धा रद्द करण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा विचार असल्याच्या बातम्या येत असतानाच बीसीसीआय अध्यक्ष आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने आयपीएल रद्द होणार की नाही यावर एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

Advertisement

आयपीएलचे १४ वे सत्र ९ एप्रिलपासून सुरू होणार आहे, ज्यामध्ये सलामीचा सामना विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स खेळणार आहे. आयपीएलच्या लीग टप्प्यातील १० सामने महाराष्ट्रात आहेत. तथापि, कोरोना विषाणंूची वाढती आकडेवारी रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आठवड्याच्या शेवटी लॉकडाऊन जाहीर केले आहे. मात्र, टाईम्स नाऊच्या हवाल्यानुसार सौरव गांगुलीने ठरलेल्या वेळापत्रकानुसारच आयपीएल सामने खेळले जातील, असे स्पष्ट केले आहे.

Advertisement

आयपीएलमध्ये मुंबईला १० एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत १० सामने खेळले जाणार आहेत. लीगचा अंतिम सामना ३० मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. काही दिवसांपूर्वी वानखेडे स्टेडियमचे ८ ते १० फील्ड वर्कर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. तर कोलकाता नाईट रायडर्सचा नितीश राणा, दिल्ली कॅपिटलचा अक्षर पटेल आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा देवदत पदीक्कलही कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे. चेन्नई सुपरकिंग्जच्या सहाय्यक कर्मचाऱ्यालाही कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्याच वेळी, देशात कोरोना विषाणूची प्रकरणे सतत वाढत आहेत. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. मात्र आयपीएल स्पर्धा ठरलेल्या वेळेतच होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply