Take a fresh look at your lifestyle.

तर बँकेकडूनही मिळतात रु. 100 / दिन; पहा UPI पेमेंटबाबत काय आहेत RBI च्या सूचना

पुणे :

Advertisement

अनेकदा आपण ऑनलाईन पेमेंट करतो. खात्यातून पैसेही वजा होतात. मात्र, संबंधित खात्यावर हे पैसे जमा न होता अडकून पडतात आणि डोकेदुखी वाढते. अशावेळी आपल्यालाचा मानसिक आणि आर्थिक झटका सहन करावा लागतो. बँक आपली फ़क़्त दंड कापायला बसून काम करीत असते.

Advertisement

बँकांकडून निरंतर प्रयत्न करूनही ग्राहकांना काही अडचणीचा सामना करावा लागत आहे. बर्‍याच वेळा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) किंवा आयएमपीएसद्वारे व्यवहार अयशस्वी होतो. अशावेळी ग्राहकांच्या खात्यातून हे पैसे वेळेवर परत केले जात नाहीत. यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) केलेला हा नियम तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. कसे ते जाणून घेऊया.  

Advertisement

जर तुमचा यूपीआय व्यवहार अयशस्वी झाला आणि खात्यातून काढलेली रक्कम वेळेवर परत केली नाही तर बँक तुम्हाला रोज 100 रुपये भरपाई देईल. होय, सप्टेंबर 2019 मध्ये केंद्रीय बँकेने अयशस्वी व्यवहारासंदर्भात एक नवीन परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार पैशांच्या स्वयंचलितपणे परत येण्यासाठी एक वेळ ठरविण्यात आली आहे. जर या कालावधीत व्यवहाराची पुर्तता किंवा पूर्ववत प्रक्रिया न झाल्यास बँकेला ग्राहकांना भरपाई द्यावी लागेल. अंतिम मुदत संपल्यानंतर ग्राहकांना दिवसाला 100 रुपये नुकसान भरपाई मिळते.

Advertisement

आरबीआयच्या परिपत्रकानुसार, जर यूपीआयमार्फत व्यवहार अयशस्वी झाला आणि ग्राहकांच्या खात्यातून पैसे वजा केले गेले आणि वेळेत पुन्हा पैसे लाभार्थ्याच्या खात्यात जमा झाले नाहीत तर T (व्यवहाराची तारीख) + 1 दिवसात अशी भरपाई मिळण्यास आपण पात्र असता. म्हणजेच, जर आज एखाद्या ग्राहकाचा व्यवहार अयशस्वी झाला असेल तर दुसर्‍या व्यवसायाच्या दिवसापर्यंत पैसे खात्यावर परत केले पाहिजेत. सुट्टी वगळून असेही त्यात म्हटलेले आहे. जर तसे झाले नाही तर अधिक विलंब झाल्यास बँकांना नुकसान भरपाई म्हणून 100 रुपये द्यावे लागतील.

Advertisement

यूपीआयमार्फत व्यवहार अयशस्वी झाल्यास आणि पैसे परत केले गेले नाहीत तर आपण सेवा प्रदात्यास तक्रार देऊ शकता. तक्रार करूनही बँकेकडून प्रतिसाद मिळाला नाही तर आपण आरबीआयच्या लोकपालन योजनेच्या डिजिटल व्यवहारांच्या अंतर्गतही तक्रार दाखल करू शकता.

Advertisement

यूपीआय अर्थात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस ही एक इंटरबँक फंड ट्रान्सफर सुविधा आहे. ज्याद्वारे स्मार्टफोनवरील फोन नंबर आणि व्हर्च्युअल आयडीच्या सहाय्याने देयके दिली जाऊ शकतात. हे इंटरनेट बँक निधी हस्तांतरणाच्या यंत्रणेवर आधारित आहे. ही प्रणाली एनपीसीआयद्वारे नियंत्रित आहे. वापरकर्ते काही मिनिटांतच यूपीआयकडून पैसे घेऊन पैसे हस्तांतरित करतात.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply