Take a fresh look at your lifestyle.

सुवर्णसंधी : ईकॉमर्सच्या संधी समजावून सांगणार अमेझॉन; SMBHAV द्वारे व्हा डिजिटली अर्थसाक्षर

मुंबई :

Advertisement

सध्याचा काळ हा ऑनलाईनचा आहे. आपण अनेक गोष्टी सध्या ऑनलाईन खरेदी करतो. त्याचवेळी करोना लॉकडाऊनमुळे आता शिक्षण, खरेदी आणि बातम्यांचे विश्वही खऱ्या अर्थाने ऑनलाईन झालेले आहे. अशावेळी सामान्य भारतीयांना डिजिटल भारतामधील संधी समजावून सांगण्यासाठी अमेझॉन या बहुराष्ट्रीय कंपनीने भारतीयांसाठी SMBHAV हे व्यासपीठ (Amazon Smbhav Summit 2021 ; Unlocking Infinite Possibilities for a Digital India) विकसित केले आहे.

Advertisement

यामध्ये काय असेल?

Advertisement

वाचक मित्र-मैत्रिणींनो, नेटवर्किंग हे व्यावसायिक यशाचे महत्वाचे टूल आहे. आपण जुन्या काळातही परिसरातील ओळखी किंवा पैपाहुणे यांच्यासह व्यवसायाला सुरुवात करायचो. मग सेवा आणि गुणवत्ता यांच्या जोरावर आपण तो व्यवसाय वाढवत न्यायचो. ज्यांना, सेवाभाव आणि गुणवत्ता यांची योग्य सांगड घालता आलेली नाही. त्याचा व्यवसाय डूबतोही. तसाच प्रकार सध्या सोशल मिडिया आणि ऑनलाईन नेटवर्किंगचा आहे. उलट या इंटरनेटच्या जगात ग्लोबल संधी विकसित झालेल्या आहेत.

Advertisement

SMBHAV या पोर्टलवर जाऊन नाव, ईमेल आणि व्यावसायिक माहिती भरून आपण लॉग इन पूर्ण करू शकता. मग आपणास या पोर्टलवर थ्री डी व्हर्च्युअल दुनियेमध्ये जाऊन ३५ पेक्षा अधिक तासांचे व्हिडिओ पाहायला मिळतील. ज्यामध्ये ७० पेक्षा जास्त बिजनेस टायकून आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ आपणास मार्गदर्शन करतील. इंडस्ट्री एक्स्पर्टकडून टेक्नोलॉजी आणि बिजनेस मंत्र शिकून आपण डिजिटली अर्थसाक्षर नक्कीच होऊ शकाल. जो मंत्र आपल्याला व्यावसायिक वृद्धीसाठी उपयोगी ठरेल.

Advertisement

हे दिग्गज करणार मार्गदर्शन :

Advertisement
  • इंद्रा नुई (माजी चेअरमन, पेप्सिको)
  • सुनील मित्तल (चेअरमन, भारती एअरटेल)
  • नंदन निलकेणी (को-फाउंडडर, इन्फोसिस)
  • अमित अगरवाल (कंट्री हेड, अमेझॉन इंडिया)
  • प्रा. के. सुब्रमण्यम (मुख्य आर्थिक सल्लागार, भारत सरकार)
  • श्रीधर वेन्बू (मुख्य कार्यकारी अधिकारी, झोहो कॉर्पोरेशन)
  • अलका अरोरा (जॉइंट सेक्रेटरी, MSME, भारत सरकार)
  • पियुष पांडे (कार्यकारी चेअरमन, ओगील्वी इंडिया)
  • संजीव मेहता (चेअरमन, हिंदुस्तान युनिलिव्हर)
  • राजेश मेगो (मुख्य कार्यकारी अधिकारी, मेक माय ट्रीप)

यांच्यासह ७० पेक्षा अधिक महत्वाच्या व्यक्ती आणि विविध क्षेत्रातील नामाकीत व्यक्ती आपले अनुभव आणि ज्ञान याद्वारे भारतीयांना शेअर करणार आहेत. त्यासाठी आजच Amazon Smbhav 2021 | Unlocking Infinite Possibilities for a Digital India (www.smbhav.com) यावर जाऊन आपली नोंदणी करा.

Advertisement

लेखन व संपादन : सचिन मोहन चोभे  

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply