Take a fresh look at your lifestyle.

म्हणून पवारांनी दिली वळसे पाटील यांनाच संधी; पवारांचे PA म्हणूनही काम केल्याचा आहे अनुभव..!

पुणे :

Advertisement

अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने अखेर आता या पदावर काम करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांना संधी दिली आहे. वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनुभवी नेत्यांपैकी एक असल्याने त्यांच्या कडक शिस्तीत राज्याच्या पोलीस प्रशासनाची घडी पुन्हा व्यवस्थित बसवण्याची मोठी जबाबदारी त्यांना दिलेली आहे.

Advertisement

महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेवेळीच वळसे पाटील यांनी हे पद स्विकारावे असे शरद पवारांना वाटत होते. मात्र, प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी नम्रपणे हे नाकारले होते. आता त्यांनाच संधी देऊन पुन्हा एकदा पक्षाची प्रतिमा सुधारण्याचे काम वळसे पाटील यांना देण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवतानाच पुढे गृहमंत्रालयाची जबाबदारी आता दिलीप वळसे पाटील यांच्याकडे राहणार असल्याचेही कळवले आहे, असे एएन आय या वृत्तसंस्थेने म्हटलेले आहे.

Advertisement

ळसे पाटील यांच्याकडे असलेला कामगार विभागाचा कार्यभार आता हसन मुश्रीफ यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार म्हणून सोपवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर, उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादात सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्याने हे बदल करण्यात आलेले आहेत.

Advertisement

वळसे पाटील यांचे कार्यक्षमतेचे महत्वाचे मुद्दे :

Advertisement
  • वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठे नाव
  • विधीमंडळाच्या कामकाजाचा मोठा अनुभव 
  • 2009 ते 2014 या कालखंडात त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली
  • राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले होते
  • वळसे पाटील हे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून सलग सातव्यांदा आमदार झाले आहेत
  • वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ऊर्जा, उत्पादन शुल्क, कामगार विभागासारख्या महत्त्वाचे खात्यांचे मंत्री म्हणून काम सांभाळले आहे

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply