Take a fresh look at your lifestyle.

ना गेल.. ना धोनी.. ना हार्दिक.. ना रोहित…; ‘हा’ आहे आयपीएलचा नवा सिक्सर किंग..!मुंबई :
क्रिकेट विश्वात जेव्हा सिक्सर किंगचा प्रश्न येतो तेव्हा तेव्हा युवराज सिंग, क्रिस गेल, रोहित शर्मा, निकोलस पुरन,  कायरन पोलार्ड, हार्दिक पंडया, महेंद्रसिंग धोनी आदी नावे पुढे येतात. पण सिक्सर किंगची ही पदवी आता २२ वर्षांच्या नव्या फलंदाजाला मिळाली असून ईशान किशन असे या खेळाडूचे नाव आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या डावखुऱ्या  सलामीवीराची ही कहाणी.

Advertisement

आयपीएलच्या इतिहासात किंवा टी २० क्रिकेट इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत ख्रिस गेलच्या आसपास कोणी नसले तरी आयपीएलच्या शेवटच्या सत्रात ईशान किशनने आपला षटकारांचा जलवा दाखवला आहे. इशानने संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळलेल्या आयपीएल २०२० मध्ये सर्वाधिक ३० षटकार लगावले होते. त्याने १४ सामन्यात ५७.३३ च्या सरासरीने ५१६ धावा केल्या. आयपीएल २०२० मध्ये राजस्थान रॉयल्सच्या संजू सॅमसनने १४ सामन्यात २६ षटकारांसह दुसरे स्थान पटकावले आहे. तर मुंबई इंडियन्सच्या हार्दिक पांड्याने १४ सामन्यात २५ षटकार ठोकले. पंजाब किंग्जचा निकोलस पूरण १४ सामन्यांत २५ षटकारांसह चौथ्या स्थानावर आहे. पाचव्या क्रमांकावर कोलकाता नाईट रायडर्सच्या इयान मॉर्गनने १४ सामन्यांत २४ षटकार ठोकले आहेत.

Advertisement

आयपीएलमध्ये ईशान किशन आतापर्यंत ५१ सामने खेळला आहे. त्याने २८.८३ च्या सरासरीने आणि १३६.८३ च्या स्ट्राइक रेटने १२११ धावा केल्या आहेत. त्याची सर्वाधिक धावसंख्या ९९ धावा असून त्याने आयपीएलमध्ये ७ अर्धशतके झळकावली आहेत. तर त्याच्या नावावर एकूण ६४ षटकार आणि १०० चौकारांची नोंद आहे. त्याची गेल्या हंगामातील कामगिरी अप्रतिम होती. त्याने गेल्या हंगामात १४ सामन्यांत ५७.३३ च्या सरासरीने आणि १४५.७६ च्या स्ट्राइक रेटने ५१६ धावा केल्या आहेत. यात ४ अर्धशतक, ३६ चौकार आणि ३० षटकारांचा समावेश आहे.  

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply