Take a fresh look at your lifestyle.

राफेल विमान डील : काँग्रेसने केला ‘तो’ प्रश्न; पहा फ्रान्सच्या वृत्तपत्राने बातमीत काय म्हटले होते ते

मुंबई :

Advertisement

राफेल व्यवहारात भारतीय मध्यस्थाला डॅसॉल्टने ५ लाख युरो गिफ्ट म्हणून दिल्याची बातमी फ्रांसमध्ये प्रसिद्ध झाली आहे. फ्रान्समध्ये यावरून खळबळ उडालेली आहे. तर, भारतात विशेष खळबळ उडालेली नाही. मात्र, काँग्रेस या विरोधी पक्षाने यावर पुन्हा एकदा राजकीयदृष्ट्या रान उठवले आहे. फ्रान्समधील भ्रष्टाचारविरोधी तपास संस्था AFA ने डसॉल्टच्या बँक खात्यांचे ऑडिट केल्यानंतर ही बाब समोर आली आहे. 

Advertisement

राफेल घोटाळा झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वेळोवेळी मांडला आहे. काही कागदपत्रांच्या आधारे द हिंदू आणि इंडियन एक्स्प्रेस यांनीही याच्या काही बातम्या केल्या होत्या. मात्र, यात घोटाळा झाल्याकडे देशाने अजूनही विशेष लक्ष दिलेले नाही. मात्र, आता फ्रांसमधून बातमी आल्यावर कॉंग्रेसने या मुद्द्यावर आणखी एकदा उचल खाल्ली आहे.

Advertisement

त्यांनी म्हटले आहे की, मोदी सरकार उत्तर द्या! दोन सरकारांमधील संरक्षण करारात किंवा भारतातील कोणत्याही संरक्षण खरेदी करारात ‘Middleman’ आणि ‘Payment of Commission’ ला परवानगी कशी काय दिली जाऊ शकते – हे संरक्षण खरेदी प्रक्रियेचे सर्रास उल्लंघन नाही का?

Advertisement

ट्विटरवर याबाबतची इमेज बनवून महाराष्ट्र काँग्रेसने शेअर केली आहे. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, (Rafael deal) खरेदी करारानंतर डसॉल्ट कंपनीने भारतीय मध्यस्थाला एक दशलक्ष युरोंची लाच दिल्याचे फ्रान्समध्ये सुरु असलेल्या चौकशीतून समोर आले असून ‘चौकीदार ही चोर है’, हे सिद्ध झाले आहे.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply