Take a fresh look at your lifestyle.

मंत्रीपदामध्ये ‘असे’ बदल होण्याची शक्यता; पहा नेमके कोणाला मिळणार गृहमंत्रीपद..?

मुंबई :

Advertisement

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर जबाबदारीच्या या रिक्त पदावर काम करण्याची संधी कोणत्या नेत्याला मिळणार याबाबतची चर्चाही जोरात आहे. हे पद ज्येष्ठ नेते आणि उत्पादन शुल्क व कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे जाण्याच्या बातम्या येत आहेत. दरम्यान, या पदासाठी आणखीही काही नावे चर्चेत आहेत.

Advertisement

टीव्ही 9 मराठी यांनी म्हटले आहे की, वळसे पाटील निवडीवर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांनी दिली आहे. तर, त्यांनी पुढे म्हटले आहे की, मंत्री हसन मुश्रीफ यांचे नावही गृहमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा होती. मात्र, मुश्रीफ तातडीने मुंबईला रवाना झाल्याचेही सांगितले जात असतानाच त्यांना कामगार मंत्री ही जबाबदारी मिळणार आहे. तर, उत्पादन शुल्क खात्याचा कारभार हा उपमुख्यमंत्री अजित पवार स्वीकारतील.  संध्याकाळपर्यंत शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा करतील. त्यानंतर उद्या दिलीप वळसे-पाटील तातडीने या खात्याची सूत्रे हाती घेतील.

Advertisement

एकूणच हे जबाबदारीचे पद कोणाला मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. वळसे पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. वळसे पाटील यांना राज्यकारभाराचाही अनुभवही मोठा आहे. त्याचबरोबर अशा परिस्थितीत एक स्वच्छ चारित्र्याच्या नेत्याकडे गृहखाते जाणे राष्ट्रवादी काँग्रेससाठी गरजेचे आहे. त्यामुळे वळसे-पाटलांकडे गृहमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे, असे बातमीत म्हटलेले आहे.

Advertisement

दरम्यान, ‘लोकमत’ने हे पद प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राजेश टोपे किंवा हसन मुश्रीफ यांना मिळणार असल्याचे बातमीत म्हटले आहे. त्यांनीही फ़क़्त शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे शरद पवार कोणाला संधी देणार हे अजूनही स्पष्ट नाही.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply