Take a fresh look at your lifestyle.

म्हणून वळसे पाटील याचे नाव आघाडीवर; पहा नेमके काय म्हटले जातेय गृहमंत्री पदाबाबत..!

पुणे :

Advertisement

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर आता या जबाबदारीच्या पदावर राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला संधी देणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलेले आहे. त्यावर एनडीटीव्हीचे सिनिअर पत्रकार सोहित मिश्रा यांनी ट्विट केले आहे. त्यांनी सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, हे पद आता ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांना मिळण्याची चिन्हे आहेत.

Advertisement

माननीय उच्च न्यायालय, मुंबई यांनी त्यांच्याकडे अॅड. जयश्री पाटील यांचेद्वारे दाखल याचिकेमध्ये आज दिनांक ५ एप्रिल २०२१ रोजी पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश पारित केलेले आहेत. त्या अनुषंगाने मी, मंत्री (गृह) या पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही, म्हणून मी स्वत:हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे. सबब, मला मंत्री (गृह) या पदावरुन कार्यमुक्त करावे, ही नम्र विनंती, असे पत्र देऊन अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे.

Advertisement

sohit mishra on Twitter: “दिलीप वलसे पाटिल होंगे महाराष्ट्र के नए गृहमंत्री: सूत्र” / Twitter

Advertisement

एनडीटीव्हीचे सिनिअर पत्रकार सोहित मिश्रा यांनी म्हटलेले असतानच सध्या या पदासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि इतरही नवे चर्चेत आहेत. मात्र, अनुभव आणि शांत वृत्तीने प्रशासकीय कारभार करणाऱ्या मंत्री वळसे पाटील यांच्याकडेच हे पद येईल असे म्हटले जात आहे. देशमुख यांच्यानंतर आता पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी या पदावर ज्येष्ठ आणि समतोल व समन्वय राखून काम करणारा व्यक्ती येईल असे म्हटले जात आहे.

Advertisement

देशमुख पायउतार झाल्यावर या पदावर कोणाला संधी मिळणार याच्या शक्यता आणि चर्चांना उधाण आलेले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पदावर कोणाला संधी मिळणार हे स्पष्ट केलेले नाही. त्यामुळेच आणखी कोण रेसमध्ये आहे आणि कोणाला या पदावर काम करण्याची संधी मिळणार यावर अधिकृतरीत्या बातमी आल्यावरच चित्र स्पष्ट होणार आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply