Take a fresh look at your lifestyle.

मंत्री गडाख यांच्यावर भाजपची टीका; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी पत्रात

अहमदनगर / सोलापूर :

Advertisement

राज्याचे जलसंधारण मंत्री आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्यावर भाजपने टीका केली आहे. पालकमंत्री महोदय ‘शंकरा’प्रमाणे तिसरा डोळा उघडून कोरोनाचा नायनाट करा, गायब न होता जिल्ह्यात येऊन उपाययोजना करा’, असे आवाहन त्यांनी पत्रातून केले आहे.

Advertisement

उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्याचवेळी येथील पालकमंत्री गडाख जिल्ह्याकडे फिरकत नसल्याची टीका होत आहे. त्यावर भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी त्यांना अनाहूत पत्र लिहून जिल्ह्यात येण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण दिले आहे. सध्या काळे यांचे हे पत्र वेगाने चर्चेत आलेले आहे.

Advertisement

काळे यांनी पत्रात म्हटलेय की, जिल्ह्यात कोरोनाने निर्माण झालेल्या गंभीर परस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी व जिल्हातील नागरिकांना सहकार्य करण्यासाठी पालकमंत्री शंकरराव गडाख यांना जिल्ह्यात येण्याचे आग्रहाचे आमंत्रण आहे. पालकमंत्री २६ जानेवारीच्या ध्वजारोहणनंतर आपला पदस्पर्श जिल्ह्यात झालाच नाही. जिल्ह्यातील जनता आतुरतेने आपण याल व आपल्या नावातील शंकरा प्रमाणे तिसरा डोळा उघडून कोरोनाचा नायनाट कराल यासाठी आपली वाट पाहत आहे.

Advertisement

पुन्हा एकदा लॉकडाउनची समस्या येईल म्हणून छोटा व्यावसायिक जगावे की मरावे, कुटुंब कसे चालवावे या विवंचनेत असताना पालकमंत्री या नात्याने या प्रश्नांची सोडवणूक आपण कराल यासाठी आपल्या व्यवसायाच्या दारातच तो आपली वाट पाहतोय, डोळ्यात अश्रू घेऊन हातावर पोट असणारे असंख्य व्यक्ती आज हवालदील झालेत. प्रचंड यशस्वी असणाऱ्या अशा या आघाडी सरकारचे प्रतिनिधी या नात्याने दत्त म्हणून उभे रहावे व या सर्वांसमोर येवून दिलासा द्यावा, एवढीच जिल्हावासीयांना अपेक्षा आहे, असा टोला काळे यांनी लगावला आहे.

Advertisement

आई तुळजाभवानीच्या जिल्ह्याचे तुम्ही पालकमंत्री आहात याच थोडं भान ठेवा, अन् या समस्येवर उपाय काढण्यासाठी लवकरात लवकर प्रशासनासोबतच्या बैठकीला आपण या हेच आग्रहाचे निमंत्रण जिल्ह्याच्या प्रत्येक नागरिकांच्या हृदयातून तुम्हाला देतो आहोत, असेही काळे यांनी त्या पत्रात म्हटलेले आहे. त्यामुळे आता पालकमंत्री याला कोणता प्रतिसाद व प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply