Take a fresh look at your lifestyle.

शेट्टींनी केली राष्ट्रवादी व भाजपवरही गंभीर टीका; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी

सोलापूर :

Advertisement

पंढरपूर पोटनिवडणुकीत फ़क़्त उमेदवार न देता प्रचारातही आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उडी घेतली आहे. पक्षाचे फायरब्रांड शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आता या निवडणुकीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांवर आणि पक्षाच्या धोरणावर कडाडून टीका केली आहे.

Advertisement

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार संतोष शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शेट्टी यांनी मुद्देसूदपणे विरोधी उमेदवारांच्यावर टीका केली. संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अॅड. राहुल घुले, जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, महामूद पटेल, विजय पाटील, संतोष बिराजदार, शहराध्यक्ष हर्षद डोरले तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार, शंकर संगशेट्टी, मल्लिकार्जुन भांजे, रमेश चव्हाण, बाहुबली साळवे, रणजित बागल, अनील बिराजदार आदि या सभेत उपस्थित होते.

Advertisement

शेट्टी म्हणाले की, श्री विठ्ठल साखर कारखाना आणि श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना या दोन्हींच्या संचालक मंडळाने शेतकऱ्यांचे ऊसबिल थकवले आहे. श्री. विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत. निवडणुकीतील भालके यांचा पराभव टाळण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने विठ्ठल कारखान्यावर जप्तीची कारवाई केली नाही. तर, दुसरीकडे १९ हजार जणांचे सभासदत्व रद्द करून दामाजी कारखान्याचे खासगीकरण करण्यासाठी चेअरमन समाधान अवताडे प्रयत्नशील आहेत. शेतकरी यावर अजिबात गप्प बसणार नाही.

Advertisement

संत दामाजीपंत यांनी दुष्काळात ज्वारीची कोठारे खुली केली. तर, आता त्यांच्या नावाने चालणाऱ्या कारखान्याचे अध्यक्ष शेतकऱ्यांचे पैसे बुडवतात. त्यांनाही त्यांची जागा दाखवून द्याण्याचे आवाहन शेट्टी यांनी केले. आवताडे व भालके यांचा अनुक्रमे साप व विंचू असा उल्लेख करून त्यांनी शेतकऱ्यांना आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले.

Advertisement

संपादन : संतोष वाघ   

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply