Take a fresh look at your lifestyle.

म्हणून शेतकरी संघटना दाखवतेय ‘स्वाभिमान’; पहा राष्ट्रवादीला कसे फैलावर घेतलेय राजू शेट्टींनी

सोलापूर :

Advertisement

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उमेदवार दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांना मोठा धक्का बसला आहे. येथे उमेदवारी देण्याबाबतची आपली भूमिका संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली आहे.

Advertisement

त्यांनी म्हटले आहे की, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांची भूमिका आम्हाला मान्य नाही. त्यामुळेच पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उमेदवार दिलेला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारासाठी राजू शेट्टी पंढरपुरात आल्यावर रविवारी शेट्टी यांनी पक्षाचीभूमिका मांडली.

Advertisement

पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीविषयी रोष व्यक्त करताना शेट्टी म्हणाले की, राज्यातुल साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांचे एफआरपीचे सुमारे तीन हजार कोटी रुपये थकीत असतानाही ही रक्कम देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने प्रयत्न केले नाहीत. उलट लाॅकडाऊन काळात सरकारने भरमसाठ वीजबिलाची आकारणी करून लूट केली आहे. वीजबिल माफ करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यापूर्वी सरकारकडे मागणी करूनही सरकारने दुर्लक्ष केले आहे. जोपर्यंत १०० युनिटपर्यंत घरगुती वीजबिल माफ केले जात नाही तोपर्यंत सरकार विरोधात आंदोलन केले जाईल. 

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना शेट्टी यांनी म्हटले की, या पक्षाने शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्या साखर कारखानदाराला उमेदवारी देताना आम्हाला अजिबात विचारात घेतले नाही. दोन उमेदवार साखर कारखानदार आहेत. त्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकवले आहेत. त्यांच्याकडे निवडणूक लढवायला पैसे आहेत. पण शेतकऱ्यांचे थकीत पैसे देण्यासाठी नाहीत. त्यामुळे त्यांना विरोध म्हणून आमचा उमेदवार विजयासाठी लढत आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ   

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply