Take a fresh look at your lifestyle.

भाजपच्या ‘ग्रामसुधार’ला धक्का; धामणे यांच्या गटाने घेतली सोसायटी ताब्यात..!

अहमदनगर :

Advertisement

पंचायत समितीचे सदस्य आणि भाजपचे गटनेते रवींद्र कडूस यांच्या ग्रामसुधार पॅनलचा धुव्वा उडवत १३ पैकी १३ जागा पटकावून शिक्षक नेते संजय धामणे, बाजार समिती निरीक्षक संजय काळे यांच्या लोकशाही विकास आघाडीने सारोळा कासार ही सोसायटी ताब्यात घेतली आहे.

Advertisement

सारोळा कासार गावाच्या सोसायटीसाठी शनिवारी मतदान झाले. त्यासामध्ये एकूण ९३१ पैकी ८९१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदारांनी यंदा गावात परिवर्तनाचा भक्कम कौल देताना सोसायटीवर धामणे-काळे यांच्या गटाला संधी दिली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी हा परिवर्तनाचा कौल अस्साल्याचा दावा विजयी गटाने केला आहे.

Advertisement

सर्वसाधारण मतदारसंघात असलेल्या ८ जागांमध्ये संजय रावसाहेब काळे, गोरक्षनाथ रामदास काळे, जयप्रकाश भास्कर पाटील, बापूराव विठ्ठल धामणे, महेश एकनाथ धामणे, बाळकृष्ण भीमाजी धामणे, बाळासाहेब नाथा धामणे, नाना धोंडिभाऊ कडूस, महिला राखीव मतदार संघात मनीषा शिवाजी कडूस, कमल एकनाथ कडूस यांनी विजय मिळवला.

Advertisement

तर, इतर मागासवर्ग मतदार संघातून संजय अप्पासाहेब धामणे, भटक्या विमुक्त जाती मतदारसंघात शिवाजी बाबुराव वाव्हळ, अनुसूचित जाती मतदारसंघातून चंद्रभान फकिरा जाधव या लोकशाही विकास आघाडीच्या उमेदवारांना मतदारांनी विजयाचा कौल दिला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून किरण आव्हाड तर, संतोष वासकर यांनी सहायक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. सोसायटीचे सचिव महादेव ठाणगे, सतीश कडूस व कर्मचाऱ्यांनी त्यांना निवडणूक प्रक्रियेसाठी साहाय्य केले. 

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे  

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply