Take a fresh look at your lifestyle.

आयपीएल २०२१ : पहा धोनीशी तुलना केल्यानंतर काय म्हणालाय संजू सॅमसन..!

मुंबई :
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी गणला जातो. धोनीने चेन्नई सुपर किंग्ज संघाला आंतरराष्ट्रीय पातळीवर तसेच इंडियन प्रीमियर लीगमध्ये तीन वेळा चॅम्पियन बनवले आहे. त्याच्या नेतृत्वाखालील सीएसकेचा प्रवास आयपीएलमध्ये अत्यंत प्रभावी ठरला होता आणि आठ वेळा संघ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा नवा कर्णधार संजू सॅमसनने स्वत:ची धोनीशी तुलना केल्यानंतर मोठे विधान केले आहे. यष्टीरक्षक फलंदाज सॅमसनने सांगितले की, धोनीसारखं कोणी असू शकते असे मला वाटत नाही.

Advertisement

राजस्थान रॉयल्स वेबसाइटशी बोलताना संजू सॅमसनने धोनीशी तुलना केल्याच्या प्रश्नावर सांगितले की, ‘मला वाटत नाही की कोणीही एमएस धोनीसारखं असू शकतं. गेल्या मोसमात राजस्थान रॉयल्स संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वात संघाने १४ पैकी केवळ ६ सामने जिंकले होते, तर संघ ८ सामन्यात पराभूत झाला होता. लिलावापूर्वी राजस्थान संघाने मोठा निर्णय घेत स्मिथला सोडण्यात आले आणि संजू सॅमसनला संघाचा नवा कर्णधार म्हणून घोषित केले.

Advertisement

आयपीएल २०२१ च्या लिलावात राजस्थान रॉयल्स संघाने अनेक दमदार खेळाडूंचा संघात समावेश केला आहे. ख्रिस मॉरिसला संघाने १६.२५ कोटी एवढी विक्रमी बोली लावत विकत घेतले आहे, तर डेव्हिड मिलर, शिवम दुबे या प्रभावशाली खेळाडूंनाही राजस्थानने संघात घेतले आहे. जोफ्रा आर्चरचेसलामीच्या काही सामन्यातून बाहेर पडणे ही संघासाठी चांगली बातमी नाही. कोपराच्या दुखापतीमुळे आर्चरवर शस्त्रक्रिया करावी लागली. राजस्थानने पुन्हा एकदा लिव्हिंगस्टोनला लिलावात विकत घेतले आहे, तर बॅकअप गोलंदाज चेतन सकरियाला १.२ कोटी रुपये देऊन संघात स्थान दिले आहे. 

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply