Take a fresh look at your lifestyle.

आयपीएल २०२१ : पुजाराने विराट आणि रोहितच्या स्टाईक रेटबाबत म्हटले असे; पहा काय करणार आहे तो

मुंबई :

Advertisement

तब्बल सहा वर्षानंतर इंडियन प्रीमियर लीगमध्ये पुनरागमन करणारा चेतेश्वर पुजारा या मोसमात आपला खेळ दाखवण्यास सज्ज झाला आहे. पुजाराला चेन्नई सुपर किंग्ज संघाने ५० लाखात खरेदी केले आहे. पुजारा एक तंत्रशुध्द कसोटी फलंदाज म्हणून ओळखला जातो आणि त्याच्या स्ट्राईक रेटबद्दल नेहमीच चर्चा होत असते. दरम्यान, पुजाराने म्हटले आहे की, रोहित शर्मा आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यांच्याप्रमाणे तो आयपीएल २०२१ मध्ये आपला स्ट्राइक रेट सुधारेल.

Advertisement

ईएसपीयन क्रिकइन्फोशी बोलताना पुजारा म्हणाला, हो, मी सहमत आहे की स्ट्राइक रेटचा विचार करता मी पॉवर हिटर फलंदाज नाही. पण त्याचवेळी तुम्ही विराटसारख्या खेळाडूंकडूनही शिकता. रोहित, संपूर्ण पॉवर हिटर नाही परंतु मर्यादित षटकांच्या स्वरूपात योग्य टायमिंगवर चेंडू मारणारा तो एक अव्वल खेळाडू आहे. आपण केन विल्यमसन, स्टीव्ह स्मिथकडून यांच्याकडूनही शिकु शकतो, कारण हे पण तंत्रशुध्द फलंदाज म्हणून ओळखले जातात.

Advertisement

पुजारा पुढे म्हणाला, ‘माझीही अशीच मानसिकता आहे की मला यशस्वी व्हायचे असेल तर मलाही काहीतरी नवीन करावे लागेल पण त्याचवेळी अचूक क्रिकेट शॉट्स खेळून तुम्ही धावा करू शकता. आपली क्रिकेट खेळण्याची समज ही आपली सर्वात जमेची बाजू आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात टी २० क्रिकेटमध्ये गरजेनुसार खेळात बदल केल्यामुळे त्याचा कसोटी क्रिकेटवर परिणाम होईल, असे मला वाटले होते. पण याबाबत मला हा सल्ला बराच काळापूर्वी राहुल द्रविडकडून मिळाला होता की तुम्ही वेगवेगळे शॉट्स खेळण्याचा प्रयत्न केला तरी तुमचा नैसर्गिक खेळ बदलणार नाही. 

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply