Take a fresh look at your lifestyle.

भाजप खासदारांना बसला झटका; चव्हाणांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचा मोठा विजय..!

नांदेड :

Advertisement

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलने भाजपच्या खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या गटाचा दणक्यात पराभव केला आहे. महाविकास विरुध्द भाजप अशा या चुरशीच्या लढतीत २१ पैकी तब्बल १७ जागांवर महाविकास आघाडीचे संचालक निवडून आलेले आहेत.

Advertisement

मतदानाची रविवारी मतमोजणी पार पडली. यात काँग्रेस १३, राष्ट्रवादी काँग्रेस ३ व शिवसेनेचा एका मतदारसंघात विजय झाला. तर चिखलीकर यांच्या गटाला अवघ्या ४ जागा मिळाल्या. पालकमंत्री अशोक चव्हाण आणि भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे गट या निवडण्कुत आमने-सामने आले. मुखेडमधून काँग्रेसचे माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर व चिखलीकर गटाचे गंगाधर राठोड यांच्यामध्ये झालेल्या अटीतटीच्या सामन्यात टमोगरेकर यांनी फ़क़्त एक मतदान जास्त मिळवत राठोड यांचा पराभव केला.

Advertisement

मुदखेड येथून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंद नागेलीकर व चिखलीकर गटाचे गांधीजी पवार यांच्यातही चुरशीचा सामना झाला. चिखलीकर गटाकडून कंधारमधून जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, लोह्यामधून खासदार प्रताप पाटील चिखलीकर, उमरीमधून माजी आमदार बापूसाहेब देशमुख यांचे चिरंजीव कैलास देशमुख गोरठेकर हे निवडून आले. माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे बिलोलीमधून यापूर्वीच बिनविरोध निवडले गेलेले आहेत.

Advertisement

चव्हाण यांच्या महाविकास आघाडीच्या गटाकडून शिवसेनेचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर हदगाव व जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब पाटील हे भोकरमधून बिनविरोध निवडले गेले होते. निवडणूक झाल्यावर त्याद्वारे निवडून आलेले महाविकास आघाडीचे संचालक असे :

Advertisement
 • मुदखेड सेवा सहकारी संस्था मतदारसंघ : गोविंद शिंदे नागेलीकर
 • अर्धापूर : बाबूराव कदम
 • नायगाव : माजी आमदार वसंतराव चव्हाण
 • देगलूर : विजयसिंह देशमुख
 • धर्माबाद : श्याम कदम
 • मुखेड : माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर
 • किनवट : माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर दहिफळे
 • माहूर : राजेंद्र केशवे
 • नांदेड महिला राखीव : संगीता पावडे
 •  हिमायतनगर महिला राखीव : विजयाबाई शिंदे
 •  बिगरशेती मतदारसंघ : शिवराम लुटे
 •  इतर सहकारी संस्था : मोहनराव पाटील टाकळीकर
 •  अनुसूचित जाती/जमाती राखीव : सविता मुसळे
 •  इतर मागासवर्गीय सदस्य : राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिहर भोसकर
 •  भटक्या विमुक्त जाती/जमाती व विशेष मागासवर्ग : व्यंकटराव जाळणे

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply