Take a fresh look at your lifestyle.

बिबट्यांचा ‘तो’ धोका लक्षात घेण्याची मागणी; शेतकरी संघटनेने मांडला मुद्दा

पुणे :

Advertisement

सध्या वन्यजीव संरक्षक कायदा हा जंगली प्राणी आणि पक्षी यांच्या संरक्षणाचे महत्वाचे कार्य करीत आहे. मात्र, अनेकदा त्याच्याच भीतीतून शेतकऱ्यांना आणि आदिवासी समुदायाला जगावे लागत आहे. याकडे लक्ष वेधताना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी वन्यजीव संरक्षक कायदा रद्द करण्याची मागणी केली आहे.

Advertisement

सांगली येथे पत्रकार परिषदेत रविवारी त्यांनी हा मुद्दा मांडला. पाटील म्हणाले की, बिबट्यांची झपाट्याने होणारी उत्पती लक्षात घेऊन वेळीच असा कायदा अपेक्षित आहे. कारण, आणखी पाच वर्षांतच या बिबट्यांची संख्या वाढल्यावर मग हे प्राणी अन्नासाठी थेट शेतकऱ्यांवरच हल्ला करतील असे वाटते. याचा वेळीच सरकारने विचार करण्याची गरज आहे. त्यानुसार कायद्यात बदल करावा.

Advertisement

शेतकऱ्यांना भीतिदायक स्थितीत शेती करण्यास भाग पडणारा हा कायदा असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. पुढे त्यांनी सांगितले की, सुरुवातीला केवळ एखादाच बिबट्या उसात आढळत असे. एक-दोन दिवसांनी तो अन्यत्र जात होता. मात्र, आता तर उसाच्या फडात बिबट्यांची पिल्लेदेखील आढळू लागली आहेत. याचा अर्थ बिबट्याच्या मादीसाठी उसाची शेती हे सुरक्षित अधिवासाचे ठिकाण बनले आहे. अशावेळी मग उस आणि बिबट्या यांचे नातेच तयार होईल. जे शेतकऱ्यांच्यासाठी भीतीदायक आहे.

Advertisement

राज्य सरकार आणि शासन यंत्रणा वन्यजीव संरक्षक कायद्याकडे बोट दाखवून शेतकऱ्यांच्या महत्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहेत. साध्य अभयारण्यात संरक्षण भिंत बांधण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करूनही बिबटे आणि इतर अन्य प्राणी शेतीतील पिकांचे मोठे नुकसान करतात. वन्यजीवांचे संरक्षण आवश्यक आहेच. मात्र, ते शेतकऱ्यांना बाधक ठरू लागले आहे. शेतकऱ्यांना असाच धोका नदीकाठच्या मगरीपासूनही आहे. त्यामुळे वन्यप्राणी संरक्षण कायदा केंद्राने रद्द करावा, आणि शेतकऱ्यांची या भीतीदायक परिस्थितीतून सुटका करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply