Take a fresh look at your lifestyle.

लॉकडाऊन नाही, मात्र ‘ते’ कठोर निर्बंध झालेत लागू; पहा नेमके काय म्हटलेय सरकारने

मुंबई :

Advertisement

करोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या हा महाराष्ट्रातील महाविकास आघडी सरकारपुढील मोठा प्रश्न बनलेला आहे. रुग्ण वाढत असताना लॉकडाऊन लागू न करण्याचा मोठा दबाव आहे. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर सविस्तरपणे चर्चा करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ययांनी घेतलेल्या बैठकीत झालेल्या निर्णयाबाबत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी माहिती दिली आहे.

Advertisement

लागू झालेले नियम आणि अटी अशा :

Advertisement
  • रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी
  • दिवसा १४४ कलम लागू (जमावबंदी) असणार
  • उद्या रात्री (५ एप्रिल) ८ वाजेपासून ही नियमावली लागू होणार
  • सर्व मॉल्स, रेस्तराँ, बार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला
  • होम डिलिव्हरी आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहतील
  • शासकीय कार्यालये ५० टक्के क्षमतेनने सुरू असणार
  • उद्योग संपूर्ण क्षमतेने सुरू असताना कामगारांवर बंधन नसतील
  • जिथे कामगारांना राहण्याची व्यवस्था असलेली बांधकामं सुरू राहतील
  • भाजी बाजारात नियम व अटी पळून आणि गर्दी टाळून व्यवहार करावे लागतील
  • शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाउन 

संपादन : महादेव गवळी

Advertisement

BBC News Marathi on Twitter: “महाराष्ट्रात उद्या रात्री 8 पासून निर्बंध, वीकेंडला लॉकडाऊन https://t.co/93Bl6rdfnb @OfficeofUT @rajeshtope11 @nawabmalikncp @AjitPawarSpeaks” / Twitter

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply