Take a fresh look at your lifestyle.

लॉकडाऊन की कडक निर्बंध याचा होणार निर्णय; ठाकरेंच्या बैठकीकडे लागले देशाचे लक्ष..!

मुंबई :

Advertisement

महाराष्ट्रातील वाढत्या करोना रुग्णांच्या संख्येमुळे सगळेच हतबल झाल्यासारखे झालेले आहेत. कारण, अशावेळी लॉकडाऊन हाच सध्या एकमेव पर्याय आहे. त्यालाच सर्वांचा विरोध आहे. अशावेळी दुसरा पर्याय म्हणून कठोर नियम आणि त्यांची अमलबजावणी करून रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्याच्या पर्यायाची चर्चा सुरू आहे. त्यातच रविवारी सुटीच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठक बोलावली आहे.

Advertisement

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज दुपारी 3 वाजता मंत्रिमंडळाची ऑनलाइन पध्दतीने बैठक बोलावली आहे. रविवार असूनही मुख्यमंत्र्यांनी ही तातडीची बैठक बोलावल्याने या बैठकीत कोणता महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शनिवारी मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांसह विविध क्षेत्रातील संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली होती. एकूणच राज्यातील आरोग्याची परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या शक्यतेने राज्य सरकारने ही कार्यवाही सुरू केली आहे. मुंबई आणि इतर मोठ्या शहरांमध्ये रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असूनही बाजारातील नागरिकांची गर्दी कमी होत नसल्याने आता यावर मात्रा शोधणे आवश्यक बनलेले आहे.

Advertisement

राज्यात रुग्णसंख्या वाढत असतानाही सोंगाढोंगात लग्न करण्यात आणि धार्मिक कार्यक्रमात गर्दी करण्यात जनता मागे नाही. त्याकडेही विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच आता यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार काय कार्यवाही करणार, हे आजच्या बैठकीत ठरणार आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply