Take a fresh look at your lifestyle.

किचन बजेटला झटका; म्हणून वधारल्यात मसाल्याच्याही किमती, पहा किती टक्के वाढ झालीय त्यात

पुणे :

Advertisement

यंदा करोना संकटाशी दोन हात करताना आर्थिकदृष्ट्या संकट वाढत असतानाच किचन बजेटलाही मोठा झटका बसला आहे. पेट्रोल-डीझेल व एलपीजीच्या किमती गगनाला भिडत असतानाच खाद्यतेल आणि आता मसाले यातही मोठी दरवाढ झाली आहे. त्यामुळे मासिक किराणा खर्चात तब्बल २५ टक्क्यांनी वाढ झालेली आहे.

Advertisement

मागील वर्षभरात मसाल्याचे भाव खूप कमी होते. शेतमालामध्ये सर्वाधिक फटका बसलेल्या मसाल्यांना यंदा तेजी आहे. बाजारात तब्बल ३५ ते ४० टक्के इतकी दरवाढ झालेली आहे. या भावात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे अशावेळी मग किचन बजेटमध्ये आणखी वाढ होईल.

Advertisement

२०२० मध्ये बहुतांश मसाल्यांचे क्षेत्र ५-१० टक्के कमी झाल्याने उत्पादनातही १५-२० टक्के घट झाली. परिणामी मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने आणि त्यातच निर्यातवाढीचा फटकाही बसला आहे. मसाल्याच्या पदार्थांना त्यामुळे तेजी असल्याचे केडिया अॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांनी म्हटलेले आहे.

Advertisement

आशियातील सर्वात मोठी गुंटूर मिरची बाजारपेठेत तेजी आहे. इथे मागील वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत १०-१५ % पर्यंत दरवाढ दिसत आहे. तेजा वाणाच्या लाल मिरचीचा भाव १४,८०० रु. प्रतिक्विंटल तर, बैदागी वाणाच्या मिरचीला १८ हजार रु. प्रतिक्विंटल असा भाव मिळत आहे. काळी मिरीचा भाव सुमारे १८ टक्के वाढून ३३५-३४० रु. प्रतिकिलो झाला  आहे.

Advertisement

भारतात प्रतिवर्षी सरासरी ११० लाख टन मसाल्यांची गरज असते. मसाला आणि त्याचे पदार्थ ही भारतीयांची आवड आहे. मात्र, गेल्या वर्षी उत्पादन वाढूनही जेवढे आवश्यक होते तेवढे उत्पादन काही झाले नाही. मसाला बोर्डानुसार, २०१९-२० मध्ये ९१.९ लाख टन मसाल्यांचे उत्पादन झाले होते.

Advertisement

मसाल्याचे सध्याचे भाव (घाऊक बाजार) असे :

Advertisement
मसाला पदार्थभाव (रुपये / किलो)
हळद८३
धने७२
जिरे१३५
मिरची१८०
काळी मिरी३४०

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply