Take a fresh look at your lifestyle.

ब्लॉग : ऑनलाईन-ऑफलाईन सगळे पास; दुष्परिणामाचे काय..?

पहिली ते आठवीपर्यंत सर्वांनाच पास करण्याचा निर्णय जाहीर झाला. आज विद्यार्थ्यांना आणि पालकांना या निर्णयाचा नक्कीच आनंद होईल. परंतु, यातून दीर्घकालीन नुकसान होते आहे याकडे लक्ष द्यायला हवे. अभ्यासक्रमाची रचना ही मागील वर्षीच्या अभ्यासक्रमावर आधारित पुढील अभ्यासक्रम अशी असते. संपूर्ण एक वर्षात विद्यार्थी फारसे काही शिकले नाहीत हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यासाठी सरकार या वर्षीच्या अभ्यासक्रमातील घटक पुन्हा पुढच्या वर्षीच्या अभ्यासक्रमांत टाकून अभ्यासक्रमाची फेररचना करणार आहे का? याचे उत्तर मिळायला हवे कारण कौशल्य प्राप्त न होता असेच विद्यार्थी पुढे जात राहिले तर उच्च शिक्षणात या विद्यार्थ्यांच्या हाताला काहीच लागणार नाही व हे विद्यार्थी गळती होण्याचा खूप मोठा धोका संभवतो.

Advertisement

लेखक : हेरंब कुलकर्णी, शिक्षक व सामाजिक अभ्यासक (अहमदनगर)

Advertisement

त्यात पुन्हा ऑनलाईन शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना थोडेफार तरी या इयत्तेतील क्षमता मिळण्याची शक्यता आहे पण ऑफलाईन विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठवणे त्यांच्यावर अन्याय करणारे ठरेल कारण या वर्षातील कोणताच क्षमता त्यांना प्राप्त झाल्या नव्हत्या असे विद्यार्थी जिन्याची एक पायरी काढून घेतल्यानंतर जिना चढताना जशी स्थिती होते तशी त्यांची होणार आहे.. यातून विद्यार्थ्यांवर तणाव वाढत जाऊन हे ऑफलाईन विद्यार्थी पुन्हा गळती होण्याचा धोका संभवतो व हे विद्यार्थी दलित आदिवासी भटके विमुक्त व गरीब वर्गातील आहेत याचे भान ठेवायला हवे.

Advertisement

कोरोनाच्या काळात यापेक्षा दुसरे काय करणे शक्य होते ? असा उलटा प्रश्न विचारला जाईल पण हा प्रश्नच मुळात चूक आहे याचे कारण हे शैक्षणिक वर्ष रद्द करा अशी शिफारस अनेकांनी केली होती त्याचे पालन केले असते तर आज ढकलाढकली ची वेळ आली नसती. संपूर्ण वर्ष हातातून निसटून गेले आहे हे सरळ दिसत असताना हे वर्ष पूर्ण करण्याचा अट्टाहास का केला गेला ? हे वर्ष विद्यार्थ्यांच्या इतर क्षमता विकासासाठी वापरावे अशी सूचना आमच्यासारख्यांनी केली होती वाचन व इतर कला विकसन यासाठी वर्षाचा वापर करणे व अभ्यासाचा काही भाग देणे असे करायला हवे होते..

Advertisement

पालक हा घटक आक्रमक आहे मान्य परंतु तुमचे मूल एक वर्ष उशिरा जन्माला आले असते तर तुम्ही काय केले असते असे पालकांना समजावून सांगता आले असते परंतु वर्ष पूर्ण करत विद्यार्थी पुढे ढकलायचे हीच भूमिका घ्यायची असेल तर समजा पुढील वर्षभर कोरोना असाच राहिला तर विद्यार्थ्यांना असेच पुढे टाकणार का ? तेव्हा अजूनही वेळ गेलेली नाही आहे ते शैक्षणिक वर्ष शून्यावर आणून विद्यार्थ्यांना तयारी करून घेणे हाच अंतिम मार्ग आहे. कॅलेंडरशी अशी स्पर्धा करण्यात अर्थ नाही करून निघून जाईल परंतु विद्यार्थ्यांना क्षमता प्राप्त न झाल्याने विद्यार्थी भावी आयुष्यात करिअर करू शकणार नाहीत व गरीब कुटुंबातील मुले ठेवतील हे सामाजिक भान या निमित्ताने ठेवायला हवे

Advertisement

वाचक मित्र-मैत्रिणींनो, कृषीरंग हे शेती-मातीच्या बातम्यांचे व्यासपीठ आहे. यामध्ये जनभावानेला आणि विचारांना महत्व आहे. त्यामुळेच आम्ही अनेकदा असे ब्लॉग किंवा स्वतंत्र लेख प्रसिद्ध करीत असतो. या लेखातील विचारांशी भले आम्ही पूर्णपणे सहमत असूच असे नाही. मात्र, वास्तवाशी भिडणाऱ्या शेती-मातीसाठी आणि समाजासाठी लढणाऱ्या व्यक्तींची भावना जगासमोर नेण्याचा आमचा प्रयत्न असतो. @ संपादक, कृषीरंग

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply