Take a fresh look at your lifestyle.

कोकण कृषी विद्यापीठाबाबत दळवींनी म्हटलेय असे; पहा नेमके काय घेतलेत त्यांनी आक्षेप

कोकण कृषी विद्यापीठाने अकॅडेमिक कौन्सिल वर जळगाव, मुंबई, औरंगाबाद मधले शेतकरी प्रतिनिधी नियुक्त केलेत, त्यात स्थानिक शेतकरी का नाहीत ? त्याबद्दल अनेकांनी कॉल मेसेज केलेत त्यामुळे थोडक्यात पंकज दळवी (कृषी व पर्यावरण अभ्यासक, गुहागर, कोकण, महाराष्ट्र) यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर केलेला खुलासा..

Advertisement

कोकण कृषी विद्यापीठ हे कुचकामी आणि निव्वळ टाइमपास करणारे संशोधक आणि प्राध्यापकांचा भरणा असलेलं आहे. स्वतः कुलगुरू मध्येप्रदेश मधील ग्रेन बेस्ड टेरोटरी मधून आलेले आहेत, जे की केरळ किंवा कर्नाटका मधल्या अफ्लूयन्ट शेती केल्या जाणाऱ्या विभागातून अनुभव असलेले असायला हवे होते, असो. कृषी विद्यापीठ दापोली यांनी आज पर्यंत केलेलं संशोधन हे कधीच कोकणातल्या शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहचलेल नाही. गेले कित्येक वर्षे आम्ही केरळ, कर्नाटक, गोवा इथल्या शेतकऱ्यांच्या सहाय्याने मसाले पिकांवर अनेक प्रयोग करीत आहोत, जे विद्यापीठाच्या किमान पंचवीस वर्षे पुढचे प्रयोग आहेत. भाताची सुधारित वाण जी मूळ कोकणातील आहेत, ती आज पर्यंत कोकणातल्या शेतकऱ्यांना उपलब्ध कधीही गेली नाहीत, त्यापेक्षा म्हैसूर तांदूळ संशोधन केंद्र मला खुप आपलं वाटतं. कोकण विद्यापीठाने कोकणातील शेतकरी, विद्यापिठात शिक्षण घेणारे विद्यार्थी यांच्या साठी कोणती संशोधन केली ? कोणते कार्यक्रम राबविले ? यांच्या एकूण प्राध्यापक आणि उच्च संशोधकांवर शासनाचा किती पैसा खर्च होतो ? जो की अपव्यय असतो एकाप्रकारे, अशा गोष्टी आता सार्वजनिकरीत्या यांना विचारल्या पाहिजेत. पुढे हायकोर्ट, विधानसभेत यांना उभं केलं जाईलच किंवा शेतकऱ्यांच्या मोर्चाने तरी सत्कार होईलच.

Advertisement

केरळ कृषी विद्यापीठ, कर्नाटक कृषी विद्यापीठ, गोवा मधील कोस्टल अग्रीकल्चर रिसर्च सेंटर, पन्नुर पेपर रिसर्च सेंटर किंवा वेगवेगळी कमोडिटीटीज् रिसर्च सेंटर यांमध्ये होणारी संशोधनांपेक्षा बऱ्याच त्या त्या राज्यातील शेतकऱ्यांनी खुप चांगली संशोधन केलेली आहेत, ज्यात कॉफी, मिरी, जायफळ, कोकम, जॅकफ्रुट अशी कॅशक्रॉप देखिल येतात. त्यामुळे कोकण कृषी विद्यापीठ काय वेगळं दिवे लावणार आहे ? पण कोकणातील शेतकऱ्यांच्या स्थानिक समस्या जर मुंबई, विदर्भातील शेतकऱ्यांच्याकडून विद्यापीठाला माहिती होणार असतील तर धन्य ते कृषी विद्यापीठ आणि धन्य ते कुलगुरू.

Advertisement

मला पूर्वी ह्या विद्यापीठात प्रवेश घ्यायचा होता, जो की मिळाला नव्हता कमी मार्कांमुळे (आज याचा सर्वांत जास्त आनंद ह्याच गोष्टीचा मला आहे). निसर्गवादळा नंतर विद्यापीठाचे स्टॅस्टिकल डेटाचे नमुने आणि त्यावर बडबड करणारे प्रोफेसर यांचा जवळून अनुभव घेतला आहे, फक्त आता आज पासून फक्त यांना लिहून उघड पाडायचा एक कलमी कार्यक्रम कोकणातील शेतकऱ्यांनी सुरू केला पाहिजे, बाकी मला कोकण कृषी विद्यापिठाकडून अपेक्षा कधी नव्हत्या, यापुढेही नसतील.

Advertisement

DR . BALASAHEB SAWANT KONKAN KRISHI VIDYAPEETH, DAPOLI, DIST. RATNAGIRI, Maharashtra (Agricultural University)

Advertisement

वाचक मित्र-मैत्रिणींनो, कृषीरंग हे शेती-मातीच्या बातम्यांचे व्यासपीठ आहे. यामध्ये जनभावानेला आणि विचारांना महत्व आहे. त्यामुळेच आम्ही अनेकदा असे ब्लॉग किंवा स्वतंत्र लेख प्रसिद्ध करीत असतो. या लेखातील विचारांशी भले आम्ही पूर्णपणे सहमत असूच असे नाही. मात्र, वास्तवाशी भिडणाऱ्या शेती-मातीसाठी आणि समाजासाठी लढणाऱ्या व्यक्तींची भावना जगासमोर नेण्याचा आमचा प्रयत्न असतो. याबाबतीत संबंधित संस्था, अधिकारी, पदाधिकारी किंवा संस्था यांच्यासह सामान्य माणसांचे मतही आमच्यासाठी महत्वाचे आहे. ते आपण आम्हाला ईमेलने पाठवावे. आम्ही त्यासही प्रसिद्धी देऊ. @ संपादक, कृषीरंग

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply